अ‍ॅपशहर

मारुतीच्या कारवर ५० हजारांपर्यंत डिस्काउंट, हे मॉडल मिळताहेत स्वस्त

मारुती सुझुकीच्या अनेक नवीन मॉडेल्सवर कंपनी घसघशीत डिस्काउंट देत आहे. ऑगस्ट महिन्यात कार खरेदीवर ही सूट मिळणार आहे. या डिस्काउंटमध्ये मारुती कंपनीच्या अनेक कारचा समावेश आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Aug 2020, 3:06 pm
नवी दिल्लीः लॉकडाऊन दरम्यान कार कंपन्यांची विक्री आतापर्यंतच्या सर्वात खालच्या स्तरावर पोहोचली होती. देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कंपन्यांचे झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहे. यासाठी कंपन्या आपल्या अनेक मॉडल्सवर डिस्काउंट आणि बेनिफिट्सच ऑफर करीत आहे. मारुतीच्या कारवर या महिन्यात जबदरदस्त डिस्काउंट दिला जात आहे. ऑगस्ट महिन्यात जर तुम्हाला ऑल्टो ८०० पासून एक-प्रेसो आणि डिझायर पर्यंतच्या कार खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर या कार स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maruti cars


वाचाः किआ सॉनेटपासून टाटा HBX पर्यंत, ऑगस्टमध्ये या ४ कार येताहेत

एस प्रेसोवर ५० हजारांचा डिस्काउंट
कंपनीने या सर्वात छोट्या एसयूव्ही वर या महिन्यात ५०,००० रुपयांपर्यंत डिस्काउंटचा फायदा देण्याचे ठरवले आहे. यात २५ हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट, २० हजार रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट आणि ५००० रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट मिळतो.

वाचाः किआ सॉनेट SUV वरून पडदा हटवला, जबरदस्त लूकसोबत दमदार फीचर्स


ऑल्टो ८०० वर ३६ हजारांपर्यंत डिस्काउंट
या प्रसिद्ध कारवर कंपनी १८ हजारांचा कॅश डिस्काउंट, १५ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ३ हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे या कारवर एकूण डिस्काउंड ३६ हजारा पर्यंत मिळू शकतो.

वाचाः ह्युंदाई वेन्यूपासून टाटा अल्ट्रोजपर्यंत ७ लाखांच्या बजेटमधील टॉप १० सुरक्षित कार


मारतीच्या या कारवर सुद्धा डिस्काउंट
मारुतीच्या वॅगन आर कारवर या महिन्यात ३३ हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंटचा यात समावेश आहे. ऑगस्ट महिन्यात स्विफ्ट आणि डिझायर वर सुद्धा अनुक्रमे ३५ हजार रुपये आणि ४० हजार रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. तसेच ब्रेझा आणि अर्टिगा या कारवर सुद्धा डिस्काउंटमध्ये खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. या दोन्ही कारवर २५ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे.

वाचाः महिंद्रा घेवून येतेय जबरदस्त SUV, १५ ऑगस्टला पाहा झलक

वाचाः टोयोटा घेवून येतेय छोटी SUV, दाखवली पहिली झलक

वाचाः मारुती सुझुकी ऑल्टोची 'नंबर वन'वर झेप, पाहा टॉप १० कार

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज
ट्रेंडिंग