अ‍ॅपशहर

बिग बॉस स्टार शिव ठाकरेची देसी कंपनी टाटा मोटर्सच्या या SUV ला पसंती, खरेदी केली पहिली नवी कार

Shiv Thakare Buys first car : बिग बॉस स्टार शिव ठाकरेने आपली पहिली कार खरेदी केली आहे. पहिली कार खरेदी करताना शिवने विदेशी कंपनीऐवजी देसी कार खरेदी करण्याला प्राधान्य दिले आहे.

Authored byबबन बन्सीधर लिहिणार | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Mar 2023, 11:34 am
नवी दिल्लीः Shiv Thakare Buys Tata Harrier : बिग बॉस 16 (Bigg Boss 16) चा रनरअप आणि मराठी बिग बॉस (Bigg Boss Marathi 2) चा विजेता ठरलेल्या शिव ठाकरेने नुकतीच एक नवीन एसयूव्ही खरेदी केली आहे. पहिली गाडी खरेदी करताना शिव ठाकरेनी टाटा मोटर्सला पसंती देत टाटा हॅरियर खरेदी केली आहे. नुकतेच हॅरियर रेड डार्क एडिशन लाँच झाले असून या गाडीला शिव ठाकरेने प्राधान्य दिले आहे. अनेक सेलिब्रिटिज महागड्या आणि लग्झरी कार खरेदी करतात. परंतु, शिव ठाकरेने देसी कंपनीची एसयूव्ही खरेदी केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Shiv Thakare Buys first car


शिव ठाकरेची पहिली नवीन कार
शिव ठाकरेने टाटा शोरूम वर जावून नवीन हॅरियर एसयूव्हीची डिलिव्हरी घेतली. शिव या आधी सेकंड हँड कार चालवत होता. ही कार शिवने खूप आधी खरेदी केली होती. टाटा हॅरियर रेड डार्क शिवची पहिली नवीन कार आहे. शिवने बिग बॉस मध्ये येवून देशभरातील लोकांचे मन जिंकले आहे. सतत हसमुख आणि काळजी असणाऱ्या स्वभावमुळे शिव बिग बॉसमधील अनेकांचा पसंतीचा स्पर्धक होता.

वाचाः ADAS फीचर्सची कार हवीय?, या ७ कार आहेत बेस्ट, मार्केटमध्ये आहे जलवा

हॅरियरचा लूक आणि फीचर्स शानदार
Tata Harrier Red Dark Edition ला कंपनीने नुकतेच लाँच केले असून या कारची किंमत २१.७७ लाख रुपये सुरुवातीची किंमत आहे. यात #DARK फ्लॉन्ट बोल्ड ओबेरन ब्लॅक एक्सटीरियर, रेड कॅलिपर्स सोबत R18 चारकोल ब्लॅक अलॉय व्हील, रेड इंटीरियर थीम, रेड लेदरेट सीट्स सारखे खास फीचर्स दिले आहेत. यात नवीन १०.२५ इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, ३६० डिग्री कॅमेरा आणि ऑटोमॅटिक इमरजन्सी ब्रेकिंग, रियर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, रियर कोलाइजन वॉर्निंग आणि हाय बीम असिस्ट सारखे ADAS फीचर्स दिले आहेत.

वाचाः ३० दिवसात २.८८ लाख लोकांनी खरेदी केली ही बाइक, किंमत फक्त ७२ हजार रुपये
लेखकाबद्दल
बबन बन्सीधर लिहिणार
"बबन बन्सीधर लिहिणार हे प्रिंट आणि डिजिटल मीडियात १८ वर्षाहून जास्त अनुभव असलेले सीनिअर कॉपी एडिटर आहेत. त्यांनी २००४ पासून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांना डिजिटल मीडियात १० वर्षांहून जास्त अनुभव आहे. सध्या, ते टेक आणि ऑटो सेक्शनची जबाबदारी सांभाळत आहेत. गेल्या ८ वर्षांपासून ते हे सेक्शन सांभाळत आहेत. या कामांव्यतिरिक्त बबन लिहिणार हे उत्कृष्ट जलतरुणपटू आहेत. त्यांना पोहण्याची आणि नवीन गोष्टी शिकण्याची प्रचंड आवड आहे. मीडिया क्षेत्रात त्यांच्या विविध आवडी आणि अनुभवामुळे त्यांना जगाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळाला आहे. जो नेहमी त्यांच्या लिखाणात आणि संपादन कार्यात उमटलेला दिसतो. बबन यांचा पाहण्याचा दृष्टिकोन आणि नवीन ट्रेंड मध्ये अपडेट राहण्यासाठी त्यांचे हे लिखाण आहे. ते कोणत्याही पब्लिकेशनसाठी मौल्यवान गोष्ट ठरते."... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज
ट्रेंडिंग