नवी दिल्ली : होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (HMSI) लवकरच आपली नवीन 2021 Goldwing BS 6 प्रीमियम मोटरसायकल बाजारात लाँच करणार आहे. कंपनीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे याबाबत माहिती दिली. नवीन गोल्डविंग बाइक आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये आधीपासूनच विक्रीसाठी उपलब्ध असून आता ही क्रूझर बाइक भारतीय बाजारातही लाँच होणार आहे. होंडा गोल्डविंग एक युनिक, प्रीमियम आणि लग्जरी बाइक आहे. या शानदार लग्जरी बाइकमध्ये अनेक लेटेस्ट फीचर्सचा भरणा असून नवीन अपडेटमध्ये यातील फीचर्सची लिस्ट अजून मोठी झालीये.
या बाइकमध्ये अपग्रेडेड ऑडिओ आणि स्पीकर सिस्टिम, ७ इंचाची टच स्क्रीन, अॅपल कार प्ले आणि अँड्राइड ऑटो अॅप कनेक्टिव्हिटी असे खास फीचर्स दिले आहेत. हायवेवर अति वेगामुळे विंड बफेटिंगपासून बचावासाठी समोर इलेक्ट्रॉनिक अॅड्जस्टेबल स्क्रीन आहे. या बाइकमध्ये ४ मोड्स आहेत, यामध्ये रेन, टुअर, स्पोर्ट आणि econ या मोड्सचा समावेश आहे. स्पीकर आणि ऑटोमॅटिक व्हॉल्यूम अॅडजस्टमेंटसारखे फीचर्सही या बाइकमध्ये आहेत. याशिवाय इलेक्ट्रॉनिक फीचर म्हणून यात एबीएस सिस्टिम, ड्युअल ब्रेक सिस्टिम, इडलिंग स्टॉप सिस्टिम, स्मार्ट KEY फीचर आणि हिल स्टार्ट यांसारखे फीचर्स आहेत. 2021 होंडा Goldwing इंजिन :-
या जबरदस्त बाइकमध्ये होंडाने १,८३३ cc क्षमतेचे फ्लॅट-६, लिक्विड कूल्ड इंजिनचा वापर केला असून हे इंजिन ५,५५० आरपीएमवर १२४.७ bhp ची पॉवर आणि ४५०० आरपीएमवर १७० Nm टॉर्क निर्माण करते. यासोबत ६-स्पीड मॅन्युअल आणि ७-स्पीड DCT गिअरबॉक्सचा पर्याय आहे. याशिवाय कंपनीने या बाइकच्या मॅन्युअल ट्रान्समिशन व्हेरिअंटमध्ये असिस्ट आणि स्लिपर क्लचही दिले आहे.
2021 होंडा Goldwing ची किंमत :-
वर्ष २०१८ मध्ये कंपनीने या बाइकमध्ये काही अपडेट दिले होते, त्यात डबल-विशबोन फ्रंट सस्पेंशन होतं. शिवाय बाइकच्या मागील बाजूला एक प्रो लिंक सिस्टिमही देण्यात आली आहे. ब्रेकिंगसाठी यामध्ये पुढील बाजूला ६-पिस्टन कॅलिपर्ससह ट्विन ३२० MM डिस्क आणि 3-पिस्टन कॅलिपरसह रिअर सिंगल ३१६ MM रोटरचा वापर केला गेला आहे. भारतीय बाजारात होंडा गोल्डविंग या अत्यंत दमदार बाइकची किंमत कंपनी जवळपास २८ ते ३० लाख रुपये (एक्स-शोरूम) असू शकते.
या बाइकमध्ये अपग्रेडेड ऑडिओ आणि स्पीकर सिस्टिम, ७ इंचाची टच स्क्रीन, अॅपल कार प्ले आणि अँड्राइड ऑटो अॅप कनेक्टिव्हिटी असे खास फीचर्स दिले आहेत. हायवेवर अति वेगामुळे विंड बफेटिंगपासून बचावासाठी समोर इलेक्ट्रॉनिक अॅड्जस्टेबल स्क्रीन आहे. या बाइकमध्ये ४ मोड्स आहेत, यामध्ये रेन, टुअर, स्पोर्ट आणि econ या मोड्सचा समावेश आहे. स्पीकर आणि ऑटोमॅटिक व्हॉल्यूम अॅडजस्टमेंटसारखे फीचर्सही या बाइकमध्ये आहेत. याशिवाय इलेक्ट्रॉनिक फीचर म्हणून यात एबीएस सिस्टिम, ड्युअल ब्रेक सिस्टिम, इडलिंग स्टॉप सिस्टिम, स्मार्ट KEY फीचर आणि हिल स्टार्ट यांसारखे फीचर्स आहेत.