अ‍ॅपशहर

Alto ते Dzire पर्यंत, दिवाळीआधी मारुतीच्या कारवर जबरदस्त डिस्काउंट

विक्री वाढवण्यासाठी कंपन्या खूप सारे ऑफर्स आणि डिस्काउंट ग्राहकांना देत आहेत. जाणून घ्या मारुतीच्या कोणत्या कारवर ऑक्टोबर महिन्यात किती डिस्काउंट मिळणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Oct 2020, 8:20 pm
नवी दिल्लीः ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे. भारतात फेस्टिव सीजन आता फार दूर राहिला नाही. भारतात सीजनमध्ये लोक चारचाकी आणि दुचाकी वाहन खरेदी करणे पसंत करतात. विक्री वाढवण्यासाठी कंपन्या खूप सारे ऑफर्स आणि डिस्काउंट ग्राहकांना देत आहेत. जाणून घ्या मारुतीच्या कोणत्या कारवर ऑक्टोबर महिन्यात किती डिस्काउंट मिळणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम alto to dzire


वाचाः नव्या व्हेरियंटमध्ये येतेय MG Hector, पाहा काय बदलणार

मारुती एस प्रेसो
मारुतीच्या या छोट्या एसयूव्हीवर या महिन्यात डिस्काउंट ऑफर केला जात आहे. या कारवर २३ हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट, २० हजारांचा एक्सचेंज बोनस आणि ५ हजारांचा कॉर्पोरेट डिस्काउंट मिळत आहे.

वाचाः महिंद्राची थार भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

मारुती इको
मारुतीच्या या कारवर एकूण ३८ हजारांचा डिस्काउंट दिला जात आहे. यात १३ हजारांचा कॅश डिस्काउंट बोनस, २० हजारांचा एक्सचेंज बोनस आणि ५ हजारांचा कॉर्पोरेट बोनस मिळत आहे.

वाचाः रेनॉकडून क्विड निओटेक एडिशन भारतात लाँच, लूक जबरदस्त

मारुती डिझायर

या कारवर ऑक्टोबर महिन्यात ४४ हजारांचा डिस्काउंट मिळत आहे. यात १४ हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट, २५ हजारांचा एक्सचेंज बोनस आणि ५ हजारांचा कॉर्पोरेट बोनस दिला जात आहे.

वाचाः Royal Enfield ला टक्कर देण्यासाठी येतेय Honda ची नवी क्लासिक बाईक

मारुती सिलारियो
या कारवर एकूण ५३ हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. यात २८ हजारांचा कॅश, २० हजारांचा एक्सचेंज आणि ५ हजारांचा कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जात आहे.

वाचाः किआच्या कारचा मोठा धमाका, केवळ १२ दिवसात रेकॉर्डब्रेक विक्री

मारुती सुझुकी ऑल्टो ८००
ही कंपनीची एन्ट्री लेवल मॉडल आहे. या कारवर ऑक्टोबर महिन्यात २१ हजारांचा कॅश डिस्काउंट, १५ हजारांचा एक्सचेंज बोनस आणि ५ हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जात आहे. एकूण ४१ हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे.

वाचाः ह्युंदाईच्या क्रेटाची रेकॉर्डब्रेक विक्री, एसयूव्ही सेगमेंटमध्ये जलवा कायम

वाचाः मारुती WagonR ने बनवला रेकॉर्ड, सर्वात जास्त विकणारी CNG कार

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज
ट्रेंडिंग