अ‍ॅपशहर

ह्युंदाईच्या या कारची धमाल, सेलमध्ये बनवला रेकॉर्ड

ह्युंदाई व्हेन्यू (Hyundai Venue) च्या एक लाखांहून अधिक युनिट्सची विक्री केली आहे. भारतात या कारची टक्कर मारुती सुझुकी विटारा ब्रेझा, टाटा नेक्सॉन आणि फोर्ड इको स्पोर्ट या कारसोबत होईल.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Jun 2020, 3:30 pm
नवी दिल्लीः ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (HMIL) ने नवीन रेकॉर्ड बनवत एका वर्षात ह्युंदाई व्हेन्यू (Hyundai Venue) च्या एक लाखांहून अधिक युनिट्सची विक्री केली आहे. व्हेन्यू कंपनीची सर्वात प्रसिद्ध कारपैकी एक आहे. कंपनीने ही कार भारतात मे २०१९ मध्ये लाँच केली होती. भारतात या कारची टक्कर मारुती सुझुकी विटारा ब्रेझा, टाटा नेक्सॉन आणि फोर्ड इको स्पोर्ट या कारसोबत होईल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hyundai venue


वाचाः Maruti Suzuki ची नवी स्कीम, काहीही खरेदी करा, मिळणार 'गिफ्ट'

विटारा ब्रेझाला टाकले मागे

ह्युंदाईची ही कार मारुतीची प्रसिद्ध कार विटारा ब्रेझाला अनेक मंथली सेल्स चार्टमध्ये मागे टाकले आहे. लाँचच्या ६ महिन्यात व्हेन्यूची ५१,००० हून अधिक जास्त युनिट्सची विक्री झाली आहे. आता या कारच्या सेलची विक्री १ लाख झाली आहे. भारतात या कारची ९७ हजारांहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. तर ७ हजार हून अधिक जास्त युनिट्सची कंपनीने निर्यात केली आहे.

वाचाः होंडाची नवी बाईक लवकरच येतेय, जाणून घ्या खास माहिती


बोल्ड डिझाईन

या कारची डिझाईन बोल्ड आहे. साईडवरून ही क्रेटा सारखी दिसते. परंतु, फ्रंट आणि रियर साईडमध्ये वेगळी आहे. एसयूव्ही मध्ये केसकेडिंग ग्रिल, स्प्लिट हेडलँम्पस, प्रोजेक्टर फॉग लॅम्प्स, एलईडी टेललॅम्प्स, १६ इंच डायमंड कट अलॉय व्हील्ज देण्यात आले आहेत. साईडमध्ये स्ट्राँग कॅरेक्टर लाईन्स याचे लूक स्पोर्टी बनवते. एसयूव्ही मध्ये प्रीमियम लेजर कट फिनिश डॅशबोर्ड आणि फॅब्रिक व लेदर फिनिश सीट्स देण्यात आली आहे. जी केबिनला प्रीमियम फील देते.

वाचाःनवीन महिंद्रा XUV500 मध्ये काय आहे खास?, जाणून घ्या डिटेल्स


चार व्हेरियंट मध्ये येते व्हेन्यू

Hyundai Venue चार व्हेरियंट मध्ये E, S, SX, SX(O) उपलब्ध आहे. ही ह्युंदाईची भारतातील पहिली गाडी आहे. जी कंपनीची ब्लूलिंक टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. ह्युंदाईने भारतात या कारला पहिली कनेक्टेड एसयूव्ही नावाने समोर आणले आहे.

वाचाः किआच्या नव्या कारसाठी व्हा तयार, जबरदस्त आहे लूक

वाचाः बजाजने आणली आणखी एक स्वस्त पल्सर, जाणून घ्या किंमत

वाचाः अजब स्कूटर, लाँचिंग आधीच झाली सर्व स्कूटरची विक्री

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज
ट्रेंडिंग