अ‍ॅपशहर

किआच्या कारचा मोठा धमाका, केवळ १२ दिवसात रेकॉर्डब्रेक विक्री

मेड इन इंडिया म्हणजेच भारतात बनवलेल्या Kia Motors च्या Kia Sonet कॉम्पॅक्ट एसयूव्ही ला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या १२ दिवसात या कारची जबरदस्त विक्री झाली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Oct 2020, 8:03 pm
नवी दिल्लीः Kia Motors ने गेल्या महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात Kia Sonet कॉम्पॅक्ट एसयूव्ही लाँच केली होती. या कारला भरतात जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. कारच्या लाँचिंगनंतर अवघ्या १२ दिवसांत या कारची ९ हजार २६६ युनिट्सची विक्री झाली आहे. या प्रमाणे कंपनीने १४७ टक्के इयर ऑन इयर ग्रोथची नोंद केली आहे. सप्टेंबर महिन्यात कंपनीने एकूण १८ हजार ६७६ युनिट्सची विक्री केली आहे. ही कार टेक लाइन आणि जीटी लाइन दोन फॉर्मेटमध्ये येते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kia sonet


वाचाः महिंद्राची थार भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

१७ व्हेरियंटमध्ये कार उपलब्ध

किआ सॉनेट दोन फॉर्मेटमध्ये एकूण १७ व्हेरियंट्समध्ये येते. कारची टेक लाइनमध्ये HTE, HTK, HTK ,HTX आणि HTX+ व्हेरियंट येते. ही कार जबरदस्त लूक आणि स्पोर्टी डिझाइनसोबत येते.

वाचाः रेनॉकडून क्विड निओटेक एडिशन भारतात लाँच, लूक जबरदस्त

मेड इन इंडिया आहे कार
किआ सॉनेटला आंध्र प्रदेशच्या अनंतपूर प्लांटमध्ये बनवले आहे. ही जगातील अन्य देशात निर्यात केली जाणार आहे. कंपनीने याला एक कनेक्टेड कार म्हणून आणले आहे. ही कार आयएमटी आणि व्हायरस प्रोटेक्शन या सारख्या हायटेक फीचर्स सोबत आणली आहे.

वाचाः ह्युंदाईच्या क्रेटाची रेकॉर्डब्रेक विक्री, एसयूव्ही सेगमेंटमध्ये जलवा कायम

३ इंजिन सोबत येते सॉनेट
किआने या कारला ३ इंजिन ऑप्शन सोबत आणले आहे. तसेच या कारला ५ स्पीड मॅन्यूअल, सिक्स स्पीड मॅन्यूअल, ६ स्पीड एटी आणि ६ स्पीड आयएमटी ऑप्शनमध्ये मिळते. किआ सॉनेट जीटी लाइनला १.० लीटर पेट्रोल इंजिन आणि १.५ लीटर टर्बो चार्ज्ड व्हेरियंटस मिळणार आहे.

वाचाः सुझुकी जिक्सर नव्या व्हेरियंटमध्ये लाँच, आता जास्त आकर्षक

वाचाः मारुती WagonR ने बनवला रेकॉर्ड, सर्वात जास्त विकणारी CNG कार

वाचाः नवी मारुती सुझुकी ऑल्टो येतेय, आधीपेक्षा लांब आणि दमदार

वाचाः सर्वांना मागे टाकून नंबर वन बनली ह्युंदाईची ही कार, पाहा टॉप ५ बेस्ट सेलर्स

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज
ट्रेंडिंग