अ‍ॅपशहर

किआ सॉनेटचे हे ५ टॉप फीचर्स दुसऱ्या कारमध्ये नाहीत, जाणून घ्या डिटेल्स

Kia Motors ची बहुचर्चित Kia Sonet या कारमध्ये जे पाच टॉप फीचर्स आहेत. ते अन्य दुसऱ्या कारमध्ये दिसत नाहीत. ही कार एक जबरदस्त कार आहे. या पाच फीचर्सविषयी जाणून घ्या..

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Aug 2020, 9:05 pm
नवी दिल्लीः Kia Motors ने नुकतीच आपली कॉम्पॅक्ट SUV किआ सॉनेट भारतात आणली होती. Kia Sonet ला कंपनीने अनेक जबरदस्त फीचर्स सोबत आणले आहे. कॉम्पॅक्ट SUV सेगमेंट मध्ये ही कार अनेक मोठ्या ब्रँड्सच्या कारला टक्कर देणार आहे. कंपनी लवकरच या कारला भारतीय बाजारात लाँच करणार आहे. या ठिकाणी आम्ही तुम्हाला या कारमध्ये मिळणाऱ्या ५ सेगमेंट फर्स्ट (सेगमेंटमध्ये पहिल्यांदा) फीचर्स संबंधी माहिती देत आहोत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Kia Sonet


10.25 इंचाचा मोठा इंफोटेंटमेंट सिस्टम
सॉनेटमध्ये किआ सेल्टॉसप्रमाणे 10.25 इंचाचा मोठा इंफोटेंटमेंट सिस्टम दिला जाणार आहे. सब ४ मीटर कॅटेगरीत सर्वात मोठा इंफोटेंटमेंट सिस्टम आहे. तसेच हा कार अॅपल कार प्ले आणि अँड्रॉयड ऑटो सोबत येतो.


व्हेंटिलेटेड फ्रंट सीट
किआ सॉनेट व्हेटिंलेटेड फ्रंट सीट सोबत येते. व्हेंटिलेटेड सीट सोबत येणारी ही आपल्या सेगमेंटची ही पहिली कार आहे. किआच्या अन्य दोन कारमध्ये किआ कार्निवल आणि किआ सेल्टॉस मध्ये व्हेंटिलेटेड देण्यात आली आहे.


डिझेल ऑटोमॅटिक

किआ सॉनेट 6 स्पीड MT सोबत ऑप्शनल गियरबॉक्स सोबत येते. ह्युंदाई वेन्यू सेम पॉवर आणि टॉर्क ऑफर करते. परंतु, ही ऑप्शनल ऑटोमॅटिक गियरबॉक्स सोबत येत नाही.


LED साउंड मूड लाइट
सेल्टॉस प्रमाणे किआ सॉनेट मध्ये सुद्धा LED साउंड मूड लाइट लाइट्स दिली आहे. जी म्यूझिक बिट्सच्यानूसार बदलते. यात तुम्हाला तुमच्या मूड प्रमाणे कलर बदलता येवू शकता येते.


फ्रंट पार्किंग सेंसर

भारतात रियर पार्किंग सेन्सर सर्व कारमध्ये बंधनकारक आहे. परंतु, किआ सॉनेट फ्रंट पार्किंग सेन्सर सोबत येते. या सेगमेंटमध्ये फ्रंट पार्किंग सेन्सरची पहिली कार आहे.

वाचाः किआच्या नवीन SUV मध्ये ५ जबरदस्त फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स

वाचाः नवी कॉम्पॅक्ट एसयूव्ही Kia Sonet कशी आहे?, जाणून घ्या ५ खास वैशिष्ट्ये

वाचाः किआ सॉनेटपासून टाटा HBX पर्यंत, ऑगस्टमध्ये या ४ कार येताहेत

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज
ट्रेंडिंग