अ‍ॅपशहर

फक्त ७० पैशात एक किलोमीटर धावते ही गाडी!

महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीने कार चाहत्यांसाठी एक खूषखबर आणली आहे. महिंद्राने देशात इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. 'महिंद्रा इ२ओ प्लस सिटी स्मार्ट' असं कारचं नाव आहे.

Maharashtra Times 25 Sep 2017, 6:01 pm
मटा ऑनलाइन वृत्त | नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mahindra electric launched e20 smart city plus car india with new features
फक्त ७० पैशात एक किलोमीटर धावते ही गाडी!


महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीने कार चाहत्यांसाठी एक खूषखबर आणली आहे. महिंद्राने देशात इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. 'महिंद्रा इ२ओ प्लस सिटी स्मार्ट' असं कारचं नाव आहे. ही कार सुरुवातीला हरयाणात विक्रीसाठी आणली आहे. शोरुममध्ये या कारची किंमत आहे ७.४६ लाख रुपये. या कारमध्ये अनेक नवनवीन फिचर्स कंपनीने आणले आहेत.

'महिंद्रा इ२ओ प्लस सिटी स्मार्ट' ही कार पूर्ण चार्ज केल्यावर १४० किलोमीटर इतका पल्ला गाठते. तसंच ही कार प्रतितास ८५ किलोमीटर इतक्या वेगाने धावू शकते. विशेष म्हणजे ही कार फक्त ७० पैशात एक किलोमीटर जाते, असा दावा महिंद्रा कंपनीने केला आहे.

'महिंद्रा इ२ओ प्लस सिटी स्मार्ट' कारमध्ये ग्राहक ४ ट्रिम लेवल्समधील (पी२, पी४, पी६, पी८) कोणत्याही ट्रिम लेवल्सची निवड करु शकतात. पी२, पी४ आणि पी६ वेरीयंट्समध्ये ४८ व्होल्टची बॅटरी बसवण्यात आली आहे. तर पी८ मध्ये ७२ व्होल्टची बॅटरी आहे. ४८ व्होल्टची बॅटरी ३ फेज इंडक्शन मोटर्सला पावर देते. तर ७२ व्होल्टची बॅटरी ४० बीएचपी इतकी पावर आणि ९१ मीटर इतका टॉर्क जनरेट करते.

ही कार कोरल ब्ल्यू, स्पार्कलिंग वाइन, आर्क्टिक सिल्वर, सॉलिड व्हाईट या रंगांमध्ये उपलब्ध आहे.
टेलिमॅटिक रिमोट डायग्नोस्टिक, स्मार्टफोन कनेक्टिविटी, नवीन इन्फोटेनमेंट सिस्टम, रिजेनरेटिव ब्रेक्स आणि हिल होल्ड कंट्रोल्स, असे नवीन फिचर्स महिंद्राने आणले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज
ट्रेंडिंग