नवी दिल्लीः Mahindra ने अखेर XUV400 इलेक्ट्रिक एसयूव्हीची डिलिव्हरी सुरू केली आहे. कंपनीच्या माहितीनुसार, देशात महिंद्रा एक्सयूव्ही ४००ची ४०० यूनिट्सची डिलिव्हरी सुरू करण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक कारची टक्कर देशात सर्वात जास्त विकली जाणारी इलेक्ट्रिक कार Tata Nexon EV शी होणार आहे. सध्या महिंद्राने नवीन इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या टॉप-स्पेक EL व्हेरियंटची डिलिव्हरी सुरू केली आहे. त्यामुळे असे मानले जात आहे की, बाकीच्या व्हेरियंट्सची डिलिव्हरी ऑक्टोबर दरम्यान सुरू केली जाणार आहे. एक्सयूव्ही ४०० कारला तीन व्हेरियंट सोबत आणले आहे. यात दोन बॅटरी पॅक ऑप्शन मिळतील. Mahindra XUV400 च्या बॅटरी पॅक मध्ये 34.5 kWh आणि 39.4 kWh ऑप्शनचा समावेश आहे. कंपनीचा दावा आहे की, इलेक्ट्रिक एसयूव्ही फक्त ८.३ सेकंदात १०० किमी प्रति तासचा वेग पकडू शकते. रेंज मध्ये ही कार फुल चार्ज झाल्यानंतर ४५६ किमी पर्यंत धावू शकते. परंतु, याची छोटी बॅटरी पॅक एकदा फुल चार्ज झाल्यानंतर ३७५ किमीचे अंतर पार करेल. DC फास्ट चार्जरने महिंद्रा एक्सयूवी400 ला ५० मिनिटात चार्ज करता येवू शकते. तर 7.2 kW AC चार्जरने ही इलेक्ट्रिक एसयूव्ही चार्ज होण्यास ६ तासांहून जास्त वेळ लागतो.
वाचाः Toll Plaza: टोल देण्याची पद्धत बदलणार, नितीन गडकरी यांची मोठी घोषणा
भारतात महिंद्रा एक्सयूवी 400 च्या EC व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत १५.९९ लाख रुपये आहे. परंतु, ७.२ kW चार्जर सोबत ईसी व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत १६.४९ लाख रुपये आहे. शेवटचा टॉप-स्पेक महिंद्रा एक्सयूवी400 चे EL व्हेरियंटची किंमत १८.९९ लाख रुपये आहे.
वाचाः एप्रिल २०२३ मध्ये या कारची होणार जोरदार एन्ट्री, पाहा कारची लिस्ट