नवी दिल्लीः मारुती सुझुकीने आपल्या ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे. कंपनीने आपल्या सर्वात स्वस्त हॅचबॅक मारुती सुझुकी ऑल्टोला महाग केले आहे. मारुतीने आपल्या ऑल्टोच्या किंमतीत ८ हजार रुपयांनी महाग केले आहे. तसेच मारुतीने आपल्या ऑल्टोच्या ३ व्हेरियंट्सची विक्री बंद केली आहे. आधी ऑल्टोची सुरुवातीची किंमत ३.२५ लाख रुपये होती. परंतु, आता STD आणि LXI व्हेरियंट्सच्या वाढलेल्या किंमतीनंतर मारुती सुझुकी ऑल्टोची सुरुवातीची दिल्ली एक्स शोरूम किंमत ४.०८ लाख रुपये झाली आहे. आज आम्ही तुम्हाला मारुती सुझुकी ऑल्टोच्या सर्व व्हेरियंट्सच्या नवीन आणि जुन्या किंमती संबंधी माहिती देत आहोत. जाणून घ्या डिटेल्स.
कोणकोणते व्हेरियंट्स झाले बंद
मारुती आधी आपल्या ऑल्टोच्या ७ व्हेरियंट्सची विक्री करीत होती. यात STD, LXI, LXI (O), VXI, VXI+, LXI CNG आणि LXI (O) CNG चा समावेश होता. आता कंपनी याच्या केवळ ४ व्हेरियंट्सची विक्री करीत आहे. यात LXI (O), VXI, VXI+, आणि LXI (O) CNG चा समावेश आहे.
केवळ एकाच व्हेरियंट्मध्ये मिळेल सीएनजीचा ऑप्शन
आधी मारुती सुझुकी ऑल्टोच्या सीएनजी कारचे दोन व्हेरियंट्स मध्ये येत होते. या ठिकाणी ग्राहकांना LXI CNG आणि LXI (O) LXI व्हेरियंट्सचा ऑप्शन मिळत होता. परंतु, आता ग्राहकांना केवळ मारुती सुझुकी ऑल्टो LXI (O) CNG व्हेरियंट्समध्ये सीएनजीचा ऑप्शन मिळेल.
वर्षात दुसऱ्यांदा महाग झाली ऑल्टो
याआधी मारुती सुझुकीने यावर्षी जानेवारी महिन्यात आपल्या ऑल्टोच्या किंमतीत वाढ केली होती. त्यावेळी कंपनीने ७ हजार रुपयांपासून ते १२ हजार रुपयांपर्यंत किंमतीत वाढ केली होती. त्यावेळी कंपनी सर्व ७ व्हेरियंट्सची विक्री करीत होती. जानेवारी महिन्यात कंपनीने ऑल्टोची सुरुवातीची किंमत ३.१५ लाख रुपयांऐवजी ३.२५ लाख रुपये केली होती.
किती देतेय मायलेज
याचे पेट्रोल मॉडल २२.०५ किमी प्रति लीटर आणि सीएनजी मॉल ३१.५९ किमी प्रति किलोग्रॅम पर्यंत मायलेज देते.
वाचाः किंमतीत कमी, मायलेज मध्ये मात्र जास्त, ४.२४ लाखाच्या किमतीच्या कारसंबंधी जाणून घ्या
वाचाः जुन्या टू-व्हीलर्सचा बंपर Sale! ₹ १६ हजारात मिळतेय Activa, ₹ २० हजारात Pulsar, पाहा डिटेल्स
वाचाः कोणाचं पोरगं आहे रे हे! ७१ हजाराच्या स्कूटीसाठी खरेदी केला १५ लाखाचा 'फॅन्सी नंबर'
वाचाः बजाजने बाइक्सच्या किंमती वाढवल्या, जाणून घ्या प्लॅटिना-पल्सरसह सर्व बाइक्सच्या किंमती किती वाढल्या
मारुती सुझुकी ऑल्टोचे व्हेरियंट्स | जुनी दिल्ली एक्स-शोरूम किंमत | नवीन एक्स-शोरूम किंमत | किती महाग झाली |
मारुती सुझुकी ऑल्टो LXI (O) | ४ लाख रुपये | ४.०८ लाख रुपये | ८,००० रुपये |
मारुती सुझुकी ऑल्टो VXI | ४.२० लाख रुपये | ४.२८ लाख रुपये | ८,००० रुपये |
मारुती सुझुकी ऑल्टो VXI+ | ४,३३,५०० रुपये | ४,४१,५०० रुपये | ८,००० रुपये |
मारुती सुझुकी ऑल्टो LXI (O) CNG | ४.९५ लाख रुपये | ५.०३ लाख रुपये | ८,००० रुपये |