अ‍ॅपशहर

खरेदी न करताच घरी घेवून जा नवी Maruti Suzuki कार, या शहरात सुरू झाली सर्विस

रोज कारमधून ऑफीसला जायचं आहे. परंतु, कार खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसे पैसे उपलब्ध नसतील तर आता चिंता करण्याची गरज नाही. मारुती सुझुकीने एक जबरदस्त स्कीम आणली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Sep 2020, 9:51 pm
नवी दिल्लीः यावर्षी जुलैमध्ये देशात सर्वात मोठी कार कंपनी मारूती सुझुकीने सब्सक्राइब प्रोग्रामची सुरुवात केली होती. याअंतर्गत कोमताही ग्राहक मारुती सुझुकीची नवीन कारला लीजवर घेऊन जावू शकतो. या प्रोग्रामला पायलट प्रोजेक्टच्या रुपाने बेंगळुरू, आणि गुरूग्राममध्ये सुरू केले होते. आता याला दिल्ली-एनसीआर (नोएडा, गाझियाबाद, फरीदाबाद) मध्ये लाँच केले आहे. सब्सक्राइब प्रोग्राम अंतर्गत मिळणाऱ्या गाड्यात मारुती सुझुकी स्विफ्ट, डिझायर, विटारा ब्रेजा, अर्टिगा, बलेनो सियाज आणि XL6 या कारचा समावेश आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maruti suzuki


वाचाः जबरदस्त फीचरची मर्सेडिजची दमदार SUV भारतात लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स

काय आहे मारुती सुझुकी सब्सक्राईब सर्विस
या सर्विस अंतर्गत १२ ते ४८ महिन्या साठी कारला लीजवर घेता येवू शकते. उदाहरणासाठी जर तुम्ही दिल्लीत राहात असाल तर मारुती सुझुकीकीच एलएक्सआयला ४८ महिन्यासाठी घेवू इच्छिता तर त्यासाठी मासिक शुल्क १४ हजार ४६३ रुपये असणार आहे. यात टॅक्सचाही समावेश आहे. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे ग्राहकांना मेंटेनेंस, झीरो डे इंश्यूरेंन्स आणि २४ तास रोडसाइड असिस्टेंटची सुविधा दिली जाते. सब्सक्रिप्शन संपल्यानंतर ग्राहक कारला अपग्रेड करू शकते. सर्विसला एक्सटेंड करू शकतात. किंवा मार्केट किंमतीत खरेदी शकता.

वाचाः फक्त १ रुपयात आवडती स्कूटी किंवा बाईक घेऊन जा, या बँकेची जबरदस्त ऑफर

कोणतेही डाऊन पेमेंट नाही
कारला लीजवर घेतल्यास कोणताही डाउन पेमेंट द्यावा लागत नाही. कारला घेण्यासाठी त्याचे व्हेरियंट आणि लीज वर्षाची निवड करून गरजेचा फॉर्म भरावा लागतो. अॅप्लिकेशन मंजूर झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत कार तुम्हाला मिळते.


वाचाः दमदार फीचर्सची MG Gloster एसयूव्ही आली, आजपासून बुकिंग सुरू

वाचाः होंडाची क्रूझर देणार रॉयल एनफील्डला टक्कर, जाणून घ्या काय आहे खास

वाचाः Toyotaची छोटी एसयूव्ही Urban Cruiser लाँच, किंमत ८.४० लाखांपासून सुरू

वाचाः टाटा मोटर्सच्या सानंद येथील कारखान्‍यातून ३००,००० वी टियागो उत्पादीत

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज
ट्रेंडिंग