अ‍ॅपशहर

मारुती सुझुकी बलेनोचे हायब्रिड मॉडेल लॉन्च

मारुती सुझुकी बलेनोचे नवे स्मार्ट हायब्रीड मॉडेल बाजारात दाखल झाले आहे. भारतीय वाहन निर्मिती क्षेत्रात अग्रेसर असलेल्या मारुती सुझुकी कंपनीने १.२ ड्युअल जेट आणि बीएस स्टेज ६ इंजिन असलेली नवीन हायब्रीड बलेनो बाजारात उतरवली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Apr 2019, 9:53 pm
नवी दिल्ली:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम new-baleno


मारुती सुझुकी बलेनोचे नवे स्मार्ट हायब्रीड मॉडेल बाजारात दाखल झाले आहे. भारतीय वाहन निर्मिती क्षेत्रात अग्रेसर असलेल्या मारुती सुझुकी कंपनीने १.२ ड्युअल जेट आणि बीएस स्टेज ६ इंजिन असलेली नवीन हायब्रीड बलेनो बाजारात उतरवली आहे.

नव्या मॉडेलनंतर बलेनोचे नेहमीचे १.२ लीटर आणि हायब्रीड असे दोन प्रकार उपलब्ध होणार असून, ग्राहकांना यासाठी ५.५८ लाख रुपये किंमत मोजावी लागणार आहे. इंजिनच्या नव्या अत्याधुनिक तंत्रामुळे पेट्रोलची मोठ्या प्रमाणात बचत होणार असल्याचा दावा कंपनीने केलाय.
मागील आर्थिक वर्षात दोन लाखांहून अधिक बलेनो मॉडेल्सची विक्री झाली असून, या गाडीचा ५.५ लाख इतका मोठा ग्राहकवर्ग आहे. नेक्साच्या माध्यमातून बलेनोची विक्री होईल, असे कंपनीच्या विपणन आणि विक्री अधिकाऱ्याने सांगितले.

नवीन मॉडेल हे 'परिपूर्ण पॅकेज' असून, यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि डिझाईन सोबतच लीथियम-इऑन बॅटरी देण्यात आली आहे. नव्या बलेनोमुळे होणारे वायू प्रदूषण साधारण गाडीच्या तुलनेत २५ टक्क्यांनी घटणार आहे. त्यामुळे ही गाडी पर्यावरणपूरक असल्याचे कंपनीने सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज
ट्रेंडिंग