अ‍ॅपशहर

मंथली चार्जवर घेवून जा मारुतीची नवी कार, कंपनीची नवी सर्विस

कारने प्रवास करण्याची हौस आहे. परंतु, कार खरेदी साठी पुरेसे पैसे नाहीत. तर आता चिंता करण्याची आवश्यकता नाही. कारण मारुती सुझुकीने मंथली चार्जवर कार देणे सुरू केले आहे. महिन्याला ठराविक रक्कम देऊन तुम्ही तुमच्या आवडत्या कारने प्रवास करू शकता.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Aug 2020, 7:36 pm
नवी दिल्लीः देशाची सर्वात मोठी कार निर्माता कंपनी Maruti Suzuki एक खास सर्विस घेऊन आली आहे. या अंतर्गत मारुती सुझुकीची नवीन कार खरेदीच्या ऐवजी भाड्याने कार घेता येवू शकते. कंपनीने याला Maruti Suzuki सब्सक्राइब सर्विस नाव दिले आहे. सध्या हे एक पायलेट प्रोजेक्ट आहे. याची सुरुवात पुणे आणि हैदराबाद मध्ये करण्यात आली आहे. यासाठी मारुती सुझुकीने सेल्फ ड्राईव्ह कार रेंटल कंपनी Myles Automotive Technology सोबत पार्टनरशीप केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maruti suzuki


वाचाः १७ लाखांची सुपरबाईक भारतात लाँच, जाणून घ्या खास वैशिष्ट्ये

काय आहे सब्सक्राईब सर्विस
ही सर्विस ग्राहकांना विना कार खरेदी करता मोठ्या काळासाठी कार वापरण्याची सुविधा देते. सर्विस अंतर्गत मारुती सुझुकीची स्विफ्ट, डिझायर, विटारा ब्रेझा, आर्टिगा, बलेनो, सियाज आमि XL6 यासारख्या गाड्या उलब्ध आहेत. या कारला १२ महिन्यांपासून १८ महिने आणि २४ महिने, ३० महिने, ३६ महिने, ४२ महिने आणि ४८ महिन्यासाठी भाड्याने कार घेता येते. तसेच ग्राहकांना मंथळी सब्सक्रिप्शन चार्ज द्यावा लागतो.

वाचाः Audi RS Q8 भारतात लाँच, किंमत २ कोटींहून जास्त

उदाहरणासाठी Swift Lxi चा पुणे मंथली चार्ज १७ हजार ६०० रुपये आहे. तर हैदराबादचा मंथली चार्ज १८ हजार ३५० रुपये आहे. या चार्ज मध्ये सर्व प्रकारच्या टॅक्सचा समावेश आहे. तसेच कोणत्याही प्रकारचा डाऊनपेमेंट नाही. तसेच चार्जमध्ये मेंटनेस, रोडसाईड असिस्टंट आणि इश्योरेंस यासारखी सुविधेचा समावेश आहे. सब्सक्रिप्शनची मुदत पूर्ण झाल्यानंतर ग्राहकांना बाय बॅक ऑप्शनचा फायदा मिळतो.

वाचाः जबरदस्त फीचर्ससोबत आली नवी होंडा जॅज, जाणून घ्या किंमत

मारुती आधी काही कंपन्यांनी ही सर्विस आणलेली आहे. याअंतर्गत एक निश्चित वेळेसाठी कार भाड्याने घेता येते. यासाठी ग्राहकांना पूर्ण किंमत द्यावी लागत नाही. तसेच कारवर मालकी हक्क सुद्धा कंपनीचा राहतो.

वाचाः किआ सॉनेटचे मायलेज ह्युंदाई वेन्यूपेक्षा जबरदस्त, जाणून घ्या लीक डिटेल्स

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज
ट्रेंडिंग