अ‍ॅपशहर

... तर कार १० मिनिटात चार्ज, ३२० KM प्रवास

तुम्हाला इलेक्ट्रिक कार खरेदी करायची आहे, पण चार्जिंगला लागणाऱ्या वेळेबद्दल चिंतेत असाल तर खुशखबर आहे. एक अशी बॅटरी बनवण्यात आली आहे, जी फक्त १० मिनिटात चार्ज होईल. अमेरिकन शास्त्रज्ञांनी याबाबतचा दावा केला आहे. १० मिनिटे चार्जिंग केल्यानंतर ही कार ३२० किमीपर्यंत चालू शकेल. पण या प्रकारची बॅटरी बाजारात येण्यासाठी आणखी १० वर्षे लागतील, असंही सांगितलं जात आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Nov 2019, 4:38 pm
वॉशिंग्टन : तुम्हाला इलेक्ट्रिक कार खरेदी करायची आहे, पण चार्जिंगला लागणाऱ्या वेळेबद्दल चिंतेत असाल तर खुशखबर आहे. एक अशी बॅटरी बनवण्यात आली आहे, जी फक्त १० मिनिटात चार्ज होईल. अमेरिकन शास्त्रज्ञांनी याबाबतचा दावा केला आहे. १० मिनिटे चार्जिंग केल्यानंतर ही कार ३२० किमीपर्यंत चालू शकेल. पण या प्रकारची बॅटरी बाजारात येण्यासाठी आणखी १० वर्षे लागतील, असंही सांगितलं जात आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम electric car


या पद्धतीने जलद चार्जिंगसाठी एका बॅटरीला ४०० किलोवॅट एनर्जीची आवश्यकता असते. पण सध्या वाहने यासाठी सक्षम नाहीत. कारण, त्यामध्ये लिथियम प्लेटिंगचा धोका असतो. यामुळे बॅटरीच्या कार्यक्षमतेवरही परिणाम जाणवतो, अशी माहिती शास्त्रज्ञाने एका अमेरिकन जर्नलमध्ये दिली. दरम्यान, सध्या कार चार्जिंगसाठी फास्ट चार्जरने तीन तास आणि सामान्य चार्जरने ६-७ तासही लागतात.

इलेक्ट्रिक वाहनांची विक्री अजूनही कमीच

अभ्यासकांच्या मते, येत्या काळात इलेक्ट्रिक कारमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. याच पार्श्वभूमीवर वेगवान चार्जिंगवर संशोधन केलं जात आहे, जेणेकरुन बॅटरी संपण्याची भीती कार चालकाच्या मनातून कायमची निघून जाईल. ही भीती नाहीशी झाल्यास इलेक्ट्रिक कारही वाढतील आणि पेट्रोल-डिझेलची बरोबरीही या कारकडून केली जाईल.

संशोधन कसं केलं?

शास्त्रज्ञांनी ही बॅटरी चार्जिंग करताना ६० डिग्री तापमानापर्यंत नेली आणि पुन्हा थंड करण्यात आली. वाढत्या तापमानामुळे ऊर्जा या बॅटरीमध्ये साठवली जाते आणि त्याने कार्यक्षमताही वाढते. यामुळे लिथियम प्लेटिंगचा धोका नाहीसा होतो. बॅटरी कूलिंग करताना ज्या तंत्रज्ञानाची गरज असते, त्याचा वापर कारमध्ये असलेल्या कूलिंग सिस्टमच्या माध्यमातून केला जाईल.

वाचा: वाहन उद्योग मंदीतून सावरला? कार विक्री वाढली

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज
ट्रेंडिंग