अ‍ॅपशहर

Mahindra Thar च्या दोन एन्ट्री लेवल व्हेरियंट बंद, आता इतकी सुरुवातीची किंमत

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने नुकतीच भारतात लाँच केलेली प्रसिद्ध कार Mahindra Thar ला भारतात चांगला प्रतिसाद मिळत असताना आता कंपनीने या कारच्या दोन एन्ट्री लेवल व्हेरियंट बंद करीत असल्याची घोषणा केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Nov 2020, 10:12 pm
नवी दिल्लीः Mahindra & Mahindra ने आपली नुकतीच लाँच केलेली ऑफ रोडर 2020 Mahindra Thar च्या एंट्री लेवल AX आणि AX Std व्हेरियंटला लाइनअप वरून हटवले आहे. कंपनीने आपल्या वेबसाइटवरून या दोन्ही व्हेरियंट्सला हटवले आहे. या व्हेरियंट्सची किंमत अनुक्रमे ९.८० लाख, १०.६५ लाख आणि १०.८५ लाख रुपये होती.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Mahindra Thar


वाचाः नेक्सॉन, ब्रेझा सारख्या कारहून स्वस्त Nissan Magnite, किंमत लिक

आता महिंद्रा थारची सुरुवातीची किंमत
एन्ट्री लेवल व्हेरियंट्स बंद केल्यानंतर आता कंपनीच्या या कारची सुरुवातीची किंमत ११.९० लाख रुपये झाली आहे. ही किंमत थारच्या AX O पेट्रोल व्हेरियंटची आहे. कारच्या पेट्रोल व्हेरियंट्सची किंमत आता ११.९० लाख रुपये ते १३.५५ लाख रुपये झाली आहे. तर डिझेल व्हेरियंट्सची किंमत १२.१० लाख रुपये ते १३.७५ लाख रुपये आहे.

वाचाः आणखी जास्त लांबीची किआ सॉनेट येतेय, ११ नोव्हेंबर रोजी लाँच होणार

आधुनिक सेफ्टी फीचर्स
या कारमध्ये सेफ्टी साठी ड्यूल फ्रंट एअरबॅग, ABS, EBD, रिवर पार्किग सेंसर, स्पीड अलर्ट सिस्टम, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम रोल ओवर मिटिगेशन, हिल होल्ड असिस्ट, हिल डीसेंट कंट्रोल यासारखे सेफ्टी फीचर्स दिले आहेत.

वाचाः दिवाळीआधी महाग झाले Yamaha चे दोन स्कूटर, जाणून घ्या नवी किंमत

दमदार परफॉर्मन्स मिळणार
नवी थार २.२ लीटर डिझेल आणि २.० लीटर mStallion टर्बो पेट्रोल इंजिन दिले आहे. डिझेल इंजिन 130bhp आणि 320Nm टॉर्क जनरेट करते. तर पेट्रोल इंजिन 187 bhp पॉवर आणि 380Nm टॉर्क जनरेट करते.

वाचाः Tata Altroz चे नवीन व्हेरियंट लाँच, पाहा किंमत-फीचर्स

वाचाः Mahindra च्या जबरदस्त एसयूव्ही New XUV500 2021 चे लाँच आधी लूक-इंटीरियर दिसले

वाचाः या दिवाळीत मारुती सुझुकी Alto, Celerio, S-Presso सह या कारवर हजारोंची सूट

वाचाः Heroच्या या बाईक आणि स्कूटरवर दिवाळी ऑफरमध्ये बंपर डिस्काउंट

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज
ट्रेंडिंग