अ‍ॅपशहर

टाटाच्या कारची जबरदस्त विक्री, 'या' छोट्या SUV ची धम्माल, १३ ला येतेय नवी कार

टाटा मोटर्सच्या कारला भारतात आधीपासूनच जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. देशात गेल्या काही दिवसांपासून करोना व्हायरस आहे. परंतु, अशा परिस्थितीतही टाटा मोटर्सच्या कारला चांगला प्रतिसाद मिळला आहे. टाटाच्या कारची जबरदस्त विक्री होत आहे. जाणून घ्या डिटेल्स.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Jan 2021, 3:05 pm
नवी दिल्लीः Tata Motors ने गेल्या महिन्यात म्हणजेच डिसेंबर २०२० मध्ये एकूण ५३ हजार ४३० युनिट्सची विक्री केली आहे. पॅसेंजर व्हीकल सेगमेंटमध्ये कंपनीने २३ हजार ५४५ युनिट्सची विक्री केली आहे. तर २०१९ मध्ये हा आकडा १२ हजार ७८५ युनिट्स होता. करोना व्हायरस जगभरात असल्याने हा आकडा सुद्धा खूप महत्त्वाचा मानला जात आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tata motors


वाचाः हिरोच्या 'या' स्कूटर-बाईक्स महाग, पाहा नवीन किंमत

८४ टक्के जास्त विक्री
टाटाने आपल्या सेलमध्ये ८४ टक्के इयर ऑन इयर सेलची नोंद केली आहे. यात नेक्सॉन, टियागो आणि हॅरियर यासारख्या मॉडल्सची विक्री जास्त राहिली आहे. यात सर्वात जास्त विक्री टाटा नेक्सॉनची आहे.

वाचाः बजाजचा ग्राहकांना झटका, पल्सर, प्लॅटिनासह 'या' बाईक महागल्या

टाटा नेक्सॉनची बंपर सेल
टाटाची प्रसिद्ध कार टाटा नेक्सॉनने जबरदस्त विक्रीची नोंद केली आहे. कंपनीने नेक्सॉनची ६ हजार ८३५ युनिट्सची विक्री डिसेंबर २०२० मध्ये केली आहे. २०१९ च्या तुलनेत हा आकडा ४३५० युनिट्स होता. या प्रमाणे नेक्सॉन डिसेंबर २०२० मध्ये कंपनीची टॉप सेलिंग मॉडल राहिले आहे. तर टाटा अल्ट्रॉज ने एकूण ६ हजार ६०० युनिट्सची विक्री केली आहे. कंपनीची फेमस हॅचबॅक टाटा टियागोची ६ हजार ६६ युनिट्सची विक्री झाली आहे.

वाचाः मारुती कारच्या चाहत्यांसाठी बॅड न्यूज, कंपनीकडून 'या' कारची लाँचिंग रद्द

टाप ३ मध्ये टाटा कायम
टाटा मोटर्सने गेल्या महिन्यात टॉप ५ कार ब्रँड्समध्ये आपले तिसरे स्थान कायम राखले आहे. कंपनीने नुकतेच कन्फर्म केले आहे की, टाटा अल्ट्रॉज आय टर्बो कंपनीची २०२१ वर्षी लाँच होणारी पहिली कार असणार आहे.

वाचाः Hyundai चा 'या' तीन कारचे प्रोडक्शन आणि विक्री बंद करण्याचा निर्णय

१३ जानेवारी रोजी येत आहे टाटा अल्ट्रॉज iTurbo
कंपनीने टाटा अल्ट्रॉजचे iTurbo व्हेरियंटची लाँचिंग वरून पडदा हटवला आहे. १३ जानेवारी रोजी कंपनी या कारवरून पडदा हटवणार आहे. ही कार १.२ लीटर आणि ३ सिलिंडर टर्बो पेट्रोल इंजिन सोबत येणार आहे.

वाचाः Toyota ची नवी 'फॉर्च्यूनर' भारतात लाँच, पाहा किंमत-फीचर्स

वाचाः फोर्डने सर्वात जास्त विकणाऱ्या 'या' कारच्या किंमतीत केली ३५ हजारांची कपात

वाचाः भारतात जबरदस्त नवी 'ऑडी' लाँच, पाहा किंमत आणि फीचर्स

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज
ट्रेंडिंग