अ‍ॅपशहर

मारुती सुझुकी S-Presso ला क्रॅश टेस्टमध्ये शून्य स्टार, टाटा मोटर्सने अशी उडवली टर!

भारतात मारुती सुझुकीच्या कारला चांगली पसंती आहे. परंतु, नुकत्याच कार सेफ्टी प्रोग्राम ग्लोबल NCAP ने भारताती काही कारची क्रॅश टेस्ट रेटिंग जारी केली आहे. यात मारुतीच्या काही कारला शून्य स्टार मिळाल्याने कंपनीला जोरदार टीकेचा सामना करावा लागत आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Nov 2020, 5:30 pm
नवी दिल्लीः कार सेफ्टी प्रोग्राम ग्लोबल NCAP ने भारतीय मार्केट मध्ये विकल्या जाणाऱ्या अनेक गाड्यांची क्रॅश टेस्ट रेटिंग जारी केली आहे. परंतु, यात सर्वात जास्त चर्चा Maruti Suzuki S-Presso ची सुरू आहे. ज्याला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये शून्य स्टार रेटिंग मिळाली आहे. ही बाब कंपनीच्या दृष्टीने खूपच चिंताजनक आहे. याचा फायदा उचलत टाटा मोटर्सने मारुती एस प्रेसोच्या खराब सेफ्टी रेटिंगचा सोशल मीडियावर टर उडवली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tata motors


वाचाः Volkswagen भारतात लाँच करणार २ नवीन SUV, समोर आली डिटेल्स

काय आहे टाटा मोटर्सचे ट्विट
टाटा मोटर्सने ट्विट करीत एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यात तुटलेला मग दिसत आहे. ज्यावर लिहिले आहे. We don't break that easy (आम्ही इतक्या सहजपणे तुटत नाही) कंपनीने आपल्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ड्रायविंगची एक वेगळी मजा आहे. परंतु, ती सेफ्टी सोबत असेल तर. बुक करा आपल्या सेगमेंटमधील सर्वात सेफ्टी कार टियागो. या ट्विटला ग्लोबल ग्लोबल NCAP चे अध्यक्ष आणि सीईओ डेविड वॉर्डने सुद्धा शेयर केले आहे. तसेच लिहिले की, मारुती सुझुकीला आता जागे होण्याची गरज आहे.



वाचाः १७ नोव्हेंबर रोजी येतेय होंडाची नवी Honda Civic, टीजर व्हिडिओत दिसली डिझाईन

मारुती सुझुकी एस-प्रेसोचे खास वैशिष्ट्ये
मारुती सुझुकी एस प्रेसो एक एन्ट्री लेवल हॅचबॅक कार आहे. कारला अडल्ट प्रोटेक्शन मध्ये शून्य स्टार आणि चाइल्ड ऑक्यूपेन्सी मध्ये २ स्टार मिळाले आहेत. कारचे VXI वेरियंट टेस्ट केले होते. या कारची किंमत ३.७० लाख रुपयांपासून सुरू होते. तसेच याच्या टॉप मॉडलची किंमत ५.१३ लाख रुपये आहे.

वाचाः मारुती सुझुकीने लाँच केले Alto, Celerio, WagonR Festive Edition, पाहा किंमत

सेफ्टी फीचर्समध्ये यात चाइल्ड प्रूफ रियर डोर लॉक, ड्राइवर साइड एयरबॅग, पॅसेंजर साइड एयरबॅग, ABS विद EBD, स्पीड अलर्ट सिस्टम, सीट बेल्ट रिमाइंडर, रिवर्स पार्किंग सेंसर यासारखे सेफ्टी फीचर्स मिळतात. तर टाटा मोटर्सची एन्ट्री लेवल हॅचबॅक सेगमेंटमध्ये टाटा टियागोला चार स्टार्स मिळाले आहेत.

वाचाः नव्या व्हेरियंटमध्ये आली Hyundai Kona Electric,आधीपेक्षा जास्त जबरदस्त फीचर्स

वाचाः Seltos आणि Creta ला टक्कर देण्यासाठी लवकरच येतेय Tata ची तीन जबरदस्त SUV

वाचाः शून्यासोबत ४ स्टार सुद्धा, क्रॅश टेस्टमध्ये मारुतीच्या कोणत्या कारला किती रेटिंग

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज
ट्रेंडिंग