नवी दिल्लीः Top 10 best selling hatchback of march 2022: जर तुम्हाला एक छोटी गाडी खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी ही खास माहिती देत आहोत. आज आम्ही तुम्हाला गेल्या महिन्यात टॉप १० बेस्ट सेलिंग हॅचबॅक गाड्यांसंबंधी माहिती देत आहोत. या गाड्यांची विक्री आणि किंमती संबंधी माहिती देत आहोत. त्यानंतर तुम्ही तुमच्या बजेटनुसार तुमच्या पसंतीची कार स्वतः निवडू शकता. जाणून घ्या डिटेल्स. टॉप १० बेस्ट सेलिंग हॅचबॅक गाड्यात गेल्या महिन्यात मारुती सुझुकीच्या ६ गाड्यांनी आपले स्थान मिळवले आहे. दर यादरम्यान ह्युंदाई आणि टाटाच्या दोन - दोन गाड्यांचा समावेश आहे. गेल्या महिन्यात मारुती सुझुकी वेगनआर देशातील सर्वात जास्त विकणारी हॅचबॅक ठरली आहे. Maruti Suzuki WagonR ची गेल्या महिन्यात २४ हजारांहून जास्त मॉडल्सची विक्री झाली आहे. तर या दरम्यान Maruti Suzuki Baleno च्या १४ हजार ५२० यूनिट्सची विक्री झाली आहे. मारुती सुझुकी स्विफ्ट ला १३ हजार ६२३ ग्राहकांनी खरेदी केले आहे.
टॉप ३ बेस्ट सेलिंग हॅचबॅक गाड्यांमध्ये मारुती सुझुकीचा एकतर्फी दबदबा पाहायला मिळाला आहे. तर टॉप ५ मध्ये मारुतीच्या ३ गाड्यांशिवाय, ह्युंदाई आणि टाटाच्या एक-एक गाड्याचा समावेश आहे.
नोटः सर्व दिल्ली एक्स शोरूम किंमती आहेत.
वाचाः अवघ्या काही सेकंदात वाऱ्याच्या वेगाने धावतात 'या' ५ बाइक्स, किंमत २ लाखांहून कमी
वाचाः बेस्ट सेलिंग इलेक्ट्रिक बाइक रिवॉल्ट आरवी400 ला टक्कर, गुजरातची 'ही' कंपनी घेऊन येतेय नवीन Electric
वाचाः Electric Scooter खरेदी करताय? २०० किमीपर्यंतची रेंज देणाऱ्या टॉप ५ स्कूटर्स पाहा
वाचाः सिंगल चार्जवर ५०० किमी रेंज आणि बटरफ्लाय डोअर्स, नेक्सॉन-टिगॉरनंतर Tata ची नवीन इलेक्ट्रिक कार सादर
वाचाः बजाजच्या 'या' २ बाइकची डिमांड सर्वात जास्त, एकाचे मायलेज १०० किमीपर्यंत, पाहा टॉप ५ सेलिंगची पूर्ण
रँक | बेस्ट सेलिंग हॅचबॅक | किती ग्राहकांनी खरेदी केली? | सुरुवातीची किंमत | टॉप एंड व्हेरिएंटची किंमत |
१ | Maruti Suzuki WagonR | २४,६३४ यूनिट्स | ५,४७,५०० रुपये | ७,०८,००० रुपये |
२ | Maruti Suzuki Baleno | १४,५२० यूनिट्स | ६.४९ लाख रुपये | ९.७१ लाख रुपये |
३ | Maruti Suzuki Swift | १३,६२३ यूनिट्स | ५.९२ लाख रुपये | ८.७१ लाख रुपये |
४ | Tata Punch | १०,५२६ यूनिट्स | ५,८२,९०० रुपये | ९,४८,९०० रुपये |
५ | Hyundai i10 Grand NIOS | ९,६८७ यूनिट्स | ५.३० लाख रुपये | ७.६१ लाख रुपये |
६ | Maruti Suzuki S-Presso | ७,८७० यूनिट्स | ३,९९,५०० रुपये | ५.६४ लाख रुपये |
७ | Maruti Suzuki Alto | ७,६२१ यूनिट्स | ४.०८ लाख रुपये | ५.०३ लाख रुपये |
८ | Maruti Suzuki Celerio | ६,४३२ यूनिट्स | ५.२५ लाख रुपये | ७ लाख रुपये |
९ | Tata Altroz | ४,७२७ यूनिट्स | ६.२० लाख रुपये | १०.१५ लाख रुपये |
१० | Hyundai i20 | ४,६९३ यूनिट्स | ६.९८ लाख रुपये | १०.८५ लाख रुपये |