अ‍ॅपशहर

TVS Scooty Pep+ झाली महाग, पाहा नवी किंमत

टीव्हीएस कंपनीची स्कूटी खरेदी करायचा विचार करीत असाल तर त्यासाठी आधीच्या तुलनेत जास्त पैसे मोजायची तयारी ठेवावी लागेल. कारण, कंपनीने आपल्या TVS Scooty Pep+ च्या किंमतीत वाढ केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Aug 2020, 5:35 pm
नवी दिल्लीः लॉकडाउन उघडल्यानंतर जर तुम्हाला स्कूटी खरेदी करायची असेल आणि त्यात तुमची पसंत Scooty Pep+ असेल तर तुमच्यासाठी एक बॅड न्यूज आहे. या स्कूटीत अॅमिशन नॉर्म्स मध्ये अनेक बदल दिसले आहेत. BS4 वरून BS6 वर अपग्रेड झाल्यानंतर कंपनीने या स्कूटीची किंमत वाढवली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम TVS Scooty Pep+


वाचाः मंथली चार्जवर घेवून जा मारुतीची नवी कार, कंपनीची नवी सर्विस

बेस व्हेरियंटची किंमत झाली ५२ हजार ५५४ रुपये
नवीन बीएस६ व्हर्जन लाँचवेळी Scooty Pep+ची सुरुवातीची किंमत ५१ हजार ७५४ रुपये ठेवण्यात आली होती. तर टॉप बेब्लिशियस व्हेरियंटची किंमत ५२ हजार ९५४ रुपये ठेवण्यात आली होती. टीव्हीएस मोटर कंपनीने याची किंमत वाढवली आहे. या व्हेरियंटची किंमत ५२ हजार ५५४ रुपये झाली आहे. तर टॉप व्हेरियंटची किंमत ५३ हजार ७५४ रुपये झाली आहे.

वाचाः MG Hector Plus च्या किंमतीत वाढ, पाहा किंमत

यामुळे वाढली किंमत
करोना महामारीमुळे कंपनीला मोठे नुकसान सोसावे लागले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी कंपनीने ८०० रुपयांची वाढ सर्व मॉडल्सवर केली आहे. TVS Scooty Pep+ ला सात कलर ऑप्शनमध्ये खरेदी करता येवू शकते.

वाचाः जबरदस्त फीचर्ससोबत आली नवी होंडा जॅज, जाणून घ्या किंमत

कोणताही मॅकॅनिकल बदल नाही
किंमत वाढवली असली तरी यात कोणताही मॅकॅनिकल बदल करण्यात आला नाही. आताही Scooty Pep+ मध्ये 87.9cc सिंगल सिलेंडर, फ्यूल इंजेक्टेड मोटर पॉवर मिळणार आहे. 5.36hp ची पॉवर आणि 6.5Nm चे पीक टॉर्क जनरेट करते. BS4 च्या तुलनेत BS6 Scooty Pep+चे आउटपूट फीगर्स हाय आहेत. याचाच अर्थ ९३ किलो वजनाची स्कूटी आता कमी फ्यूल खर्च करते.

वाचाः किआ सॉनेटचे मायलेज ह्युंदाई वेन्यूपेक्षा जबरदस्त, जाणून घ्या लीक डिटेल्स

वाचाः महिंद्रा XUV500 झाली स्वस्त, जाणून घ्या नवी किंमत

वाचाः मारुतीच्या या कारला १ वर्ष पूर्ण, २५ हजारांहून जास्त विक्री

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज
ट्रेंडिंग