अ‍ॅपशहर

Scooty Pep+ चे स्पेशल एडिशन लाँच, पाहा किंमत

टीव्हीएस मोटर कंपनीने आपली प्रसिद्ध स्कूटर Scooty Pep+ चे स्पेशल एडिशन लाँच केले आहे. तामिळनाडूमधील प्रसिद्ध सण पोंगल निमित्त हे खास एडिशन लाँच केले आहे. या स्कूटरची किंमत ५६ हजार ८५ रुपये ठेवण्यात आली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Jan 2021, 9:16 am
नवी दिल्लीः TVS Motor Company ने आपली पॉप्युलर स्कूटर Scooty Pep+ चे स्पेशल एडिशन लाँच केले आहे. कंपनीने पोंगल सणाच्या आधी हे एडिशन लाँच केले आहे. या स्कूटरला ५६ हजार ८५ रुपयांच्या किंमती सोबत लाँच केले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tvs scooty pep+ mudhal kadhal


वाचाः आधीपेक्षा जास्त दमदार इंजिन सोबत टाटाची जबरदस्त कार येतेय

काय आहे एडिशनची वैशिष्ट्ये
स्कूटी पेप प्लसचे मूधल कढल एडिशन केवळ लिमिटेड वेळेसाठी सेल केले जाणार आहे. हे नवीन एडिशन तमिळ लोकांसाठी आणि नवीन कलर स्कीम सोबत येते. याशिवाय, यात कोणताही मॅकेनिकल बदल करण्यात आला नाही. या एडिशनची विक्री केवळ तामिळनाडूमध्ये होणार आहे.

वाचाः स्कोडाच्या नवीन SUV 'कुशक' चे नाव संस्कृतमधून, जाणून घ्या अर्थ

इंजिन आणि पॉवर
या स्कूटर मध्ये ८७.८ सीसी, सिंगल सिलिंडर, एयर कूल्ड इंजिन ईको थर्स्ट टेक्नोलॉजी सोबत येते. या टेक्नोलॉजीने केवळ फ्यूल इकॉनॉमी चांगली होते. तर स्कूटरचे पिकअप परफॉर्मन्स सुद्धा वाढते. ट्रान्समिशनमध्ये या स्कूटीत सीव्हीटी ऑटोमॅटिक गियरबॉक्स सोबत येते.

वाचाः MG च्या कारला जबरदस्त डिमांड, ८० हजारांहून जास्त बुकिंग्स

या स्कूटीचे रेग्युलर व्हेरियंट ९ कलर ऑप्शन मध्ये येते. यात नीरो ब्लू, नीरो ब्राउन, प्रिंसेस पिंक, रेवविंग रेड, विवेसियस पर्पल, ग्लिटरी गोल्ड फ्रॉस्टेड कलर ऑप्शनचा समावेश आहे. याशिवाय, ही स्कूटर फ्रंट बॅग हुक, यूएसबी पोर्ट, मोबाइल चार्जर सॉकेट, साइड स्टँड अलार्म, अंडर सीट बॅग हुक्स, अंडर सीट स्टोरेज, आणि ग्लव बॉक्स सोबत येते. स्कूटी पेप कंपनीची खूपच प्रसिद्ध स्कूटर आहे. देशात मोठ्या संख्येना या स्कूटीचा वापर लोक करीत आहेत. खास करून महिलांमध्ये या स्कूटरला मोठी पसंती मिळते.

वाचाः Toyota-मारुतीची संयुक्त नवी कार येतेय, क्रेटाशी होणार टक्कर

वाचाः टाटाच्या कारची जबरदस्त विक्री, 'या' छोट्या SUV ची धम्माल, १३ ला येतेय नवी कार

वाचाः BMW 3 सीरीज ग्रॅन लिमोजिनची प्री बुकिंग ११ पासून, १ लाखांचे सन्मान पॅकेज 'फ्री'

वाचाः हिरोच्या 'या' स्कूटर-बाईक्स महाग, पाहा नवीन किंमत

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज
ट्रेंडिंग