अ‍ॅपशहर

नवी कॉम्पॅक्ट एसयूव्ही Kia Sonet कशी आहे?, जाणून घ्या ५ खास वैशिष्ट्ये

किआ सेल्टॉस आणि किआ कार्निवल या दोन कारच्या लाँचिंगनंतर किआने आपली तिसरी कार भारतात आणली आहे. किआ सॉनेट ही भारतातील कंपनीची तिसरी कार आहे. या कारची खूप दिवसांपासून चर्चा सुरू आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Aug 2020, 9:36 pm
नवी दिल्लीः किआची ही कार स्पोर्टी डिझाईन सोबत येते. कारमध्ये मॅस्क्यूलिन लूक मिळतो. तसेच कारमध्ये अलॉय व्हिल्ज, फ्लोटिंग रूफ ट्रेल, स्पोर्टी ड्यूल मफलर डिझाईन, एलईडी टेललॅम्प यासारखे फीचर्स मिळतात. किआची ही कार या वर्षातील सर्वात जास्त चर्चेतील कार पैकी एक कार आहे. भारतातील किआची ही तिसरी कार आहे. या आधी किआ मोटर्सने भारतात Kia Seltos आणि Kia Carnival या दोन कार लाँच केलेल्या आहेत. किआच्या या तिसऱ्या कारला भारतात कसा प्रतिसाद मिळतोय, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Kia Sonet


वाचाः जबरदस्त इलेक्ट्रिक बाईक, फुल चार्जवर ४७० किमी धावणार, वेग भन्नाट

इंटिरियर
किआ सॉनेट मध्ये जबरदस्त इंटिरियर देण्यात आले आहे. कार १०.२५ इंचाचा कनेक्टेड पॅनल टाइप एचडी टचस्क्रीन इन्फोटेंटमेंट सिस्टम दिला आहे. हे इंफोटेंटमेंट युनिट अँड्रॉयड ऑटो आणि अॅपल कार प्ले दोन्हींचे सपोर्ट सोबत येतो.

सेफ्टी फीचर्स
किआच्या या कारमध्ये अनेक जबरदस्त सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. यात 6 एयरबॅग, ABS चे EBD, फ्रंट आणि रियर पार्किंग सेंसर, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), ऑटो हेडलाइट, ब्रेक असिस्ट (BA), इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ESC), हिस असिस्ट कंट्रोल (HAC) यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

वाचाः किआ सॉनेट SUV वरून पडदा हटवला, जबरदस्त लूकसोबत दमदार फीचर्स

३ इंजिनचे ऑप्शन
किआने या कारला ३ इंजिन ऑप्शनमध्ये आणले आहे. त्याशिवाय या कारसोबत ५ स्पीड मॅन्यूअल सिक्स स्पीड मॅनुअल, 6 स्पीड AT आणि 6 स्पीड iMT चे ऑप्शन मिळतात. किआ सॉनेट GT Line ला १.० लीटर पेट्रोल इंजिन आणि १.५ लीटर टर्बो डिझेल इंजिन व्हेरियंट्स मिळतील.

मेड इन इंडिया कार
किआ सॉनेट ला आंध्र प्रदेशच्या अनंतपूर प्लांटमध्ये बनवण्यात आले आहे. या ठिकाणाहून ही कार अन्य देशात निर्यात केली जाणार आहे. कंपनीने याला कनेक्टेड कार म्हणून आणले आहे. ही कार आएमटी आणि व्हायरस प्रोटेक्शन यासारख्या हायटेक फीचर्ससोबत आणली आहे.

वाचाः ह्युंदाई वेन्यूपासून टाटा अल्ट्रोजपर्यंत ७ लाखांच्या बजेटमधील टॉप १० सुरक्षित कार


वाचाः मारुतीची नवी कार आली, जाणून घ्या किंमत-वैशिष्ट्ये

वाचाः टोयोटा घेवून येतेय छोटी SUV, दाखवली पहिली झलक

वाचाः TVS बाईक महाग झाली, जाणून घ्या नवीन किंमत

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज
ट्रेंडिंग