जर्मनीच्या Volkswagen ची बहुप्रतिक्षित मिड-साइज एसयूव्ही Volkswagen Tiguan ची वाट बघणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आली आहे. कंपनीने या दमदार एसयूव्हीच्या लाँचिंग डेटचा अखेर खुलासा केला आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली ही एसयूव्ही पुढील महिन्यात २३ सप्टेंबर २०२१ रोजी भारतात अधिकृतपणे लाँच होणार आहे.
२३ सप्टेंबरपासूनच विक्री-
गेल्या काही दिवसांपासून Volkswagen Tiguan ही मिड-साइज एसयूव्ही बरीच चर्चेत आहे. २३ सप्टेंबरला लाँच झाल्यानंतर त्याच दिवसापासून कंपनी भारतात Tiguan एसयूव्हीच्या विक्रीलाही सुरूवात करणार आहे. भारतात लाँच झाल्यानंतर Volkswagen Tiguan ची ह्युंडाई क्रेटा (Hyundai Creta), किया सेल्टॉस (Kia Seltos), एमजी हेक्टर (MG Hector), टाटा हॅरियर (Tata Harrier), Skoda Kushaq, ५-सीटर महिंद्रा एक्सयूव्ही 700 आणि एमजीची आगामी एसयूव्ही MG Astor यांच्यासोबत टक्कर असेल.
प्री-बुकिंगला सुरूवात -
कंपनीने Tiguan एसयूव्हीच्या प्री-बुकिंगलाही सुरूवात झाली आहे. गेल्या आठवड्यातच कंपनीने या एसयूव्हीच्या अधिकृत प्री-बुकिंगला सुरूवात केली आहे. Volkswagen India ने आपल्या नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही 2021 Volkswagen Taigun साठी कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर व डीलरशिप्सवर बुकिंगला सुरूवात केली असून ग्राहक २५ हजार रुपये टोकन अमाउंटवर ही एसयूव्ही बूक करू शकतात. Volkswagen Tiguan ही मिड-साइज एसयूव्ही कंपनीच्या विशिष्ट MQB AO IN प्लॅटफॉर्मवर आधारित आहे.
फीचर्स -
नवीन Taigun मध्ये अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार-प्ले कनेक्टिव्हिटीसह १० इंचाची इंन्फोटेन्मेंट सिस्टिम आणि My Volkswagen Connect App, वायरलेस चार्जिंग पॅड, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल एसी, १७-इंचाचे अलॉय व्हील्स, एक पूर्ण डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि अन्य अनेक फीचर्स आहेत. क्रोम ट्रीटमेंटसह स्लेटेड ग्रिल आणि स्क्वॅरिश एलईडी हेडलँप दिले आहेत. या एसयूव्हीमध्ये ड्युअल-टोन केबिनसह ब्लॅक आणि ग्रे इंटीरियर मिळेल. वायरलेस अॅपल कारप्ले (Apple CarPlay) आणि अँड्रॉइड ऑटो (Android Auto) कनेक्टिविटी, वायरलेस चार्जर, इलेक्ट्रिक सनरूफ, LED टेललँप्ससह, रिअर एसी वेंट्स, सुरक्षेसाठी ISOFIX माउंट्स, रिअर पार्किंग कॅमेरा, ABS, आणि ६ एअरबॅग्स असे सेफ्टी फीचर्स मिळतील.
इंजिन आणि किंमत -
किंमत किती असेल- Volkswagen Taigun च्या प्रोडक्शनलाही सुरूवात झाली असून पुण्यात स्कोडा ऑटो Volkswagen इंडियाच्या चाकण प्लांटमधून ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही रोलआउट देखील करण्यात आली आहे. २३ सप्टेंबरला Volkswagen Taigun भारतात लाँच होईल आणि त्याच दिवशी विक्रीलाही सुरूवात होईल. सध्या भारतात मिड-साइज एसयूव्ही सेगमेंटमध्ये ह्युंडाई क्रेटा आणि किया सेल्टॉस यांचा दबादबा असून प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देण्यासाठी भारतात या कारच्या बेसिक व्हेरिअंटला १०.५० लाख रुपयांच्या किंमतीत उतरवले जाण्याची शक्यता आहे, तर टॉप व्हेरिअंटसाठी १७ लाख रुपयांपर्यंत किंमत असू शकते.
इंजिन - भारतीय बाजारात ही एसयूव्ही दोन टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनसह लाँच होण्याची शक्यता आहे. यामध्ये १-लिटर TSI आणि १.५-लिटर TSI इंजिनचा समावेश असेल. १-लिटर TSI इंजिनसह ६-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि ६-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय मिळण्याची शक्यता आहे, तर १.५-लिटर TSI इंजिनमध्ये ६-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि ७-स्पीड DSG चा पर्यय मिळू शकतो.