अ‍ॅपशहर

Volkswagen भारतात लाँच करणार २ नवीन SUV, समोर आली डिटेल्स

भारतात ऑटो सेक्टरमध्ये मोठे मार्केट आहे. त्यामुळे देश-विदेशातील वेगवेगळ्या कंपन्या भारतात आपल्या दुचाकी आणि चारचाकी गाड्या लाँच करीत असतात. भारतीय ऑटो बाजारात आपली पकड आणखी मजबूत करण्यासाठी Volkswagen दोन नवीन एसयूव्ही लाँच करणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Nov 2020, 5:30 pm
नवी दिल्लीः भारतीय बाजारात आपली पकड मजबूत करण्यासाठी फॉक्सवेगन ने पुढील २ ते ३ वर्षात ४ नवीन एसयूव्ही भारतात उतरवण्याची घोषणा केली होती. यानंतर कंपनीने २०२० मध्ये दोन नवीन गाड्या T-ROC मिड साइज प्रीमियम एसयूवी आणि Tiguan AllSpace लॉन्च केली होती. या दोन्ही गाड्यांना ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. आता कंपनी आणखी दोन एसयूव्ही उतरवणार आहे. जाणून घ्या यासंबंधी डिटेल्स.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Volkswagen Taigun


वाचाः शून्यासोबत ४ स्टार सुद्धा, क्रॅश टेस्टमध्ये मारुतीच्या कोणत्या कारला किती रेटिंग

रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, फॉक्सवेगन वर्ष २०२१ च्या पहिल्या तिमाहीत Taigun मिड-साइज एसयूवी ला लाँच करू शकते. चौथी एसयूव्ही कोणती असेल या संबंधी अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. दरम्यान, टिगुआन ५ सीटर व्हर्जनचे पुनरागमन होवू शकते. तर काही रिपोर्ट्सच्या दाव्यानुसार, कंपनी सब ४ मीटर एसयूव्ही लाँच करू शकते. याची थेट टक्कर ह्युंदाई वेन्यू, किआ सॉनेट, टाटा नेक्सॉन आणि फोर्ड इकोस्पोर्ट यासारख्या गाड्यांसोबत होईल.

वाचाः भारतात एन्ट्री करतेय ही नवीन कार कंपनी, लाँच करणार सब कॉम्पॅक्ट SUV

फॉक्सवेगन पॅसेंजर कार्स इंडियाचे डायरेक्टर Steffen Knapp ने बिजनस इनसाइडरशी बोलताना सांगितले की, कंपनी आपल्या व्यवस्थित मार्गावर जात आहे. कंपनीने दोन प्रोडक्ट बाजारात उतरवले आहे. जे रिटेलमध्ये यशस्वी राहिले आहेत. पुढील वर्ष हे Volkswagen Taigun च्या नावावर राहिल, असे ते म्हणाले.

वाचाः Seltos आणि Creta ला टक्कर देण्यासाठी लवकरच येतेय Tata ची तीन जबरदस्त SUV

कशी असणार नवीन Taigun
फॉक्सवेगनचा दावा आहे की, टिगुआन स्टायलिंग, टेक्नोलॉजी आणि सेफ्टीमध्ये मिड साईज एसयूव्ही सेगमेंटचे रिडिफाइन करणार आहे. ही कार १.० लीटर, ३ सिलिंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि १.५ लीटर TSI EVO इंजिन सोबत येवू शकते. १.० लीटर इंजिन 115bhp ची पॉवर आणि 200Nm चे टॉर्क जनरेट करणार आहे. तर 1.5 लीटर इंजिन 148bhp ची पॉवर आणि 250Nm चे टॉर्क जनरेट करेल.

वाचाः येत आहे Toyota Innova Crysta,पाहा कधी लाँच होणार

वाचाः १७ नोव्हेंबर रोजी येतेय होंडाची नवी Honda Civic, टीजर व्हिडिओत दिसली डिझाईन

वाचाः मारुती सुझुकीने लाँच केले Alto, Celerio, WagonR Festive Edition, पाहा किंमत

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज
ट्रेंडिंग