अ‍ॅपशहर

बँकिंग परीक्षेविषयी घ्या जाणून

अभ्यासातील सातत्यच विद्यार्थ्यांना शिखरावर घेऊन जात असते. हे सातत्य कसे निर्माण करता येईल, गणिताच्या कोणत्या सोप्या ट्रिक्सचा उपयोग केल्यास बँकिंगची परीक्षा उत्तीर्ण करता येईल, यावर रविवार, २८ फेब्रुवारी रोजी बँकिंग सेवा भरती मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

Maharashtra Times 26 Feb 2016, 12:18 am
‘मटा’ आणि स्वयमतर्फे सेवा भरती कार्यशाळा रविवारी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bank exam
बँकिंग परीक्षेविषयी घ्या जाणून


म.टा. प्रतिनिधी, नागपूर

अभ्यासातील सातत्यच विद्यार्थ्यांना शिखरावर घेऊन जात असते. हे सातत्य कसे निर्माण करता येईल, गणिताच्या कोणत्या सोप्या ट्रिक्सचा उपयोग केल्यास बँकिंगची परीक्षा उत्तीर्ण करता येईल, यावर रविवार, २८ फेब्रुवारी रोजी बँकिंग सेवा भरती मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘स्वयम्’ संस्‍था आणि ‘धनवटे नॅशनल कॉलेज’च्यावतीने सकाळी ११ वाजता काँग्रेसनगर येथील धनवटे कॉलेजच्या सभागृहात या कार्यशाळेला सुरुवात होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक डॉ. राम पाटील आणि बँकिंग सोल्युशन्सचे संचालक अखिल कस्तूरकर हे तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. पोलिस आणि रेल्वे सेवा भरतीवर अलीकडेच कार्यशाळा घेण्यात आल्या होत्या. त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्याच धर्तीवर बँकिंगचा अभ्यास कसा करायचा, कोणत्या विषयांवर भर द्यायचा, किती वेळ अभ्यास करून यश प्राप्त करता येईल, यावर बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.

केंद्रीय लोकसेवा, महाराष्ट्र लोकसेवा आणि स्टाफ सिलेक्शन या तिन्ही आयोगाकडून ‌निवड करण्यात आलेल्या उमेदवारांप्रमाणेच बँकेतील अधिकाऱ्यांची वेतनश्रेणी आहे. बँकिंग क्षेत्र म्हणजे अन्य क्षेत्रापेक्षा हटके, ‘टेन्शन फ्री’ असल्याचे आणि नव्या जगाशी ओळख करून देणारे आहे, मत विद्यार्थी व्यक्त करतात.

त्यामुळे विद्यार्थ्यांचा ओढा बँकिंग परीक्षा देण्याकडे असतो. बँकिंग क्षेत्रात वळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या गणिताचा पाया भक्कम असावा, असे म्हटले जाते. ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी गणित विषयाच्या ट्रिक्सची आवश्यकता असते. गणिताची भीती दूर सारून बँ‌केच्या व्यवस्थापक, प्रोबेशनरी अधिकारी, लिपिक, लेखापाल आदी पदांसाठी तयारी करता येईल. याबाबतचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या कार्यशाळेचा विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

माहिती आणि नोंदणीसाठी राहुल खळतकर (९०४९७६३८४९) आणि अरविंद तुपे (७७४३८२५०७०) यांच्याशी संपर्क साधता येईल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज