अ‍ॅपशहर

व्हिजन आणि अॅक्शन असलेले बजेट: मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं. या अर्थसंकल्पात व्हिजन आणि अॅक्शन दोन्ही असून देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत करणारा हा अर्थसंकल्प आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Feb 2020, 8:32 pm
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं. या अर्थसंकल्पात व्हिजन आणि अॅक्शन दोन्ही असून देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत करणारा हा अर्थसंकल्प आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर देशवासियांना संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी या अर्थसंकल्पाचं विश्लेषण केलं. या अर्थसंकल्पातून मिनिमम गव्हर्नमेंट आणि मॅक्झिमम गव्हर्नन्सच्या आश्वासनाला अधिक बळकटी देण्यात आली आहे, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यावर या अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. तरुणांना नव्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच ग्रामीण रोजगार क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचं कामही या अर्थसंकल्पातून करण्यात आलं आहे. अर्थसंकल्पात सूचवलेल्या बदलांद्वारे देशाच्या अर्थव्यवस्थेला वेग येईल आणि देशाचा प्रत्येक व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदतच होणार असल्याचंही मोदी यांनी सांगितलं.

मंदीत चांदी; बळीराजाला बळ, आयकर झाला सुकर

शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं लक्ष्य या अर्थसंकल्पात ठेवण्यात आलं आहेच, शिवाय शेतकऱ्यांसाठी १६ कलमी कार्यक्रमही लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण क्षेत्रात रोजगाराची निर्मिती होण्यास मदत होणार आहे, असं सांगतानाच कृषी, पायाभूत सुविधा, टेक्सटाइल आणि तंत्रज्ञान यात रोजगार मोठ्या प्रमाणावर असतो. त्यामुळे रोजगार वाढवण्यासाठी या चारही क्षेत्रावर अर्थसंकल्पात जोर देण्यात आल्याचंही त्यांनी नमूद केलं. यावेळी मोदींनी अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या योजनांचा आढावा घेतानाच त्याचे फायदेही निदर्शनास आणून दिले.


लोकांच्या खिशात पैसा ठेवायचा आहे: अर्थमंत्री

'नवभारताकडे नेणारा सुधारणावादी अर्थसंकल्प'

हा अर्थसंकल्प सद्यपरिस्थितील गरजांची पूर्तता करतानाच भविष्यातील अपेक्षाही पूर्ण करणारा असाच आहे. या अर्थसंकल्पातून उत्पन्न आणि गुंतवणुकीसह मागणी-पुरवठ्यावरही जोर देणारा असल्याचं ते म्हणाले.


बजेट कसले? केवळ आकड्यांचा खेळ: राहुल

'Budget'ने घोर निराशा; ४ लाख कोटींचा झटका

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज