अ‍ॅपशहर

Rail Budget २०२२ : भारतीय रेल्वेसंदर्भात बजेटमध्ये मोठी घोषणा, नव्या पिढीलाही होणार लाभ

निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०२२ (Union Budget 2022) सादर करताना २०२२ चा रेल्वे अर्थसंकल्पही (Rail Budget 2022) जाहीर केला आहे. पाहा त्यांनी केलेल्या मोठ्या घोषणा ज्याने सामान्या माणसाच्या आयुष्यावर होणार मोठा परिणाम.

Maharashtra Times 1 Feb 2022, 12:16 pm
नवी दिल्‍ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०२२ (Union Budget 2022) सादर करताना २०२२ चा रेल्वे अर्थसंकल्पही (Rail Budget 2022) जाहीर केला आहे. यात त्यांनी केलेल्या घोषणेनुसार, पुढील ३ वर्षांत ४०० नवीन पिढीच्या वंदे भारत ट्रेन तयार केल्या जाणार आहेत. इतकंच नाहीतर १०० गतिशक्ती कार्गो टर्मिनलही बांधले जाणार आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Rail Budget 2022


रेल्वेसंदर्भातील महत्त्वाच्या घोषणा

उर्वरित स्थानकांची मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटी केली जाईल

एक स्टेशन-एक उत्पादनातून फायदा घेतला जाईल

पीपीपी मॉडेलच्या माध्यमातून रेल्वेच्या विस्ताराचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

मेट्रो सिस्टिमच्या उभारणीसाठी नाविन्यपूर्ण पद्धती राबविण्यात येणार आहेत.

शहरांमध्ये मेट्रो व्यवस्था सुधारली जाईल.

शहरी वाहतूक भारतीय रेल्वेशी जोडली जाईल.

लहान शेतकऱ्यांसाठी रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा विस्तार केला जाईल.

टपाल आणि रेल्वेचे जाळे अधिक चांगले होईल, येत्या तीन वर्षांत त्याची अंमलबजावणी होईल.

लहान शेतकरी आणि लघु आणि मध्यम उद्योगांसाठी रेल्वे नवीन उत्पादने आणि कार्यक्षम लॉजिस्टिक सेवा तयार करेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज