अ‍ॅपशहर

राज्यात येणार १२ लाख कोटींची गुंतवणूक

मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विविध ४३ सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या...

Maharashtra Times 20 Feb 2018, 2:00 am
मुंबई : मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विविध ४३ सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारामुळे महाराष्ट्रात १२ लाख कोटींची गुंतवणूक होणार आहे. भविष्यात महाराष्ट्रात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक होणार असून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. नामांकित उद्योग समूह आणि राज्य सरकार यांच्यात हे करार झाले. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 lakh crore investment in the state
राज्यात येणार १२ लाख कोटींची गुंतवणूक


‎यात प्रामुख्याने स्पॅनडेक्स (१२,३५० कोटी), जिनस पेपर नंदुरबार (१,०५० कोटी), येस बँक (१०,००० कोटी), राज बिल्ड इन्फ्रा एलएलपी (२,९४६ कोटी), के. रहेजा डेव्हलपर्स (४,८५० कोटी), छत्रपती शिवाजी महाराज इंडस्ट्रियल सिटी (१२,००० कोटी), क्रेडाई महाराष्ट्र (१,००,००० कोटी), नारडेको (९०,००० कोटी), एमसीएचआय क्रेडाई (७५,००० कोटी), खालीजी कमर्शिअल बँक अँड भूमिराज (५०,००० कोटी), अदानी ग्रीन एनर्जी (७,००० कोटी), टाटा पॉवर कंपनी (१५,५६० कोटी), जेएनपीटी (७,९१५ कोटी), व्हर्जीन हायपरलूप (४०,००० कोटी), यासह एसबीआय बँक, एचडीएफसी बँक, कोटक बँक, येस बँक, बीव्हीजी लाईफ, नेट मॅजिक, रेडिमेड गारमेंट क्लष्टर, वलसाड जिल्हा सहकारी बँक, कोकण बांबू आणि केन विकास केंद्र, कायनेटीक ग्रीन, आदींसोबत करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमेरिकेचे भारतातील राजदूत केनेथ जस्ट व रशियाचे भारतातील राजदूत निकोलाय झिलस्तोव्ह यांची भेट घेऊन चर्चा केली. या भेटीत विविध क्षेत्रातील गुंतवणूक कौशल्य विकास व रोजगार निर्मितीबाबत चर्चा करण्यात आली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज