अ‍ॅपशहर

गरब्याभोवतीही GST चा फेर, पारंपरिक पोशाखांवर भरभक्कम जीएसटी, नागरिकांचा संताप

GST on Garba : गरबा कार्यक्रमाच्या प्रवेशावर जीएसटी लावण्यात आल्याने गुजरातमधील लोक विरोध करत आहेत. गरब्याच्या एंट्री पासवर जीएसटीचा मुद्दा नुकताच समोर आला जेव्हा 'युनायटेड वे ऑफ बडोदा' नावाच्या एनजीओने एंट्री पासची किंमत आणि जीएसटीची माहिती त्यांच्या वेबसाइटवर शेअर केली.

Authored byप्रियांका वर्तक | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Aug 2022, 10:04 am
मुंबई : गुजरातमध्ये जीएसटीवरून लोकांनी गोंधळ घातला आहे. ताज्या वृत्तानुसार गरब्यावर केंद्र सरकारने लादलेल्या जीएसटीमुळे गुजरातमधील जनता नाराज आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये याबाबत गदारोळ झाला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम GST on Garba


सरकारकडून आकारण्यात येणारा कर, जीएसटी, यावरून बराच काळ वाद सुरू आहे. अगदी अलीकडे अनेक वस्तू आणि सेवा जीएसटीच्या कक्षेत आणल्या गेल्या आहेत, त्यानंतर सरकारला सर्वत्र स्पष्टीकरण द्यावे लागेल. अलीकडेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही संसदेत जीएसटीबाबत स्पष्टीकरण दिले.

वाचा - राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या टियर-२ खात्यासाठी नियम बदलले; असे असतील नवे नियम

गरब्याच्या वस्तूंवर किती जीएसटी
नुकत्याच झालेल्या विरोधाचे कारण म्हणजे सरकारने गरब्याशी संबंधित कार्यक्रमांच्या वस्तू आणि कार्यक्रमांवर जीएसटी लावण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार राज्य सरकारने वडोदरा, राजकोट सारख्या शहरांमध्ये गरबा कार्यक्रमांमध्ये प्रवेशासाठी एंट्री पासवर जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने प्रवेश तिकिटांवर १८ टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. दुसरीकडे, सरकार गरबा ड्रेस, चन्या-चोलीवरील जीएसटी दर वाढवण्याच्या विचारात आहे. सरकार गरबा ड्रेसवरील जीएसटी ५ टक्क्यांवरून १२ टक्के करण्याची शक्यता आहे.

वाचा - गुंतवणुकदार झाले मालामाल; फक्त २० दिवसात ६१८ रुपयांचे झाले २ लाख!

गरब्यात एंट्री पासवरील जीएसटीचा मुद्दा ऐरणीवर
गरब्याच्या एंट्री पासवर जीएसटीचा मुद्दा नुकताच समोर आला जेव्हा 'युनायटेड वे ऑफ बडोदा' नावाच्या एनजीओने एंट्री पासची किंमत आणि जीएसटीची माहिती त्यांच्या वेबसाइटवर शेअर केली. ही गैर-सरकारी संस्था (एनजीओ) गरबा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ओळखली जाते. वेबसाइटनुसार, ९ दिवसांसाठी पुरुषांच्या पासची किंमत ४,८३८ रुपये आहे, ज्यामध्ये ४१०० रुपये प्रवेश शुल्क आणि १८ टक्के जीएसटी म्हणजेच ७३८ रुपये समाविष्ट आहेत. दुसरीकडे, महिलांना प्रवेशासाठी १२९८ रुपये द्यावे लागतील, ज्यामध्ये १,१०० रुपये शुल्क आणि १९८ रुपये जीएसटी समाविष्ट आहे.

वाचा - तुमच्या मालकीची एकापेक्षा जास्त घरं आहेत? मग हे वाचाच, तुम्हीही येऊ शकता IT च्या रडारवर

उत्पन्नावर सरकारची नजर
वडोदरामध्ये असे सुमारे १ लाख पास जारी केले जातात. याद्वारे राज्य सरकारला जीएसटीच्या रूपात १.५० कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळू शकते. त्याचप्रमाणे राजकोटमध्ये जारी होणारे सुमारे ५० हजार पासमधून सरकारला १ कोटी रुपये मिळू शकतात. एंट्री पासशिवाय चन्या चोलीवर ५ टक्के ते १२ टक्के जीएसटी आकारण्याची देखील तयारी आहे. जर त्यांची किंमत १००० रुपयांपर्यंत गेली, तर ५ टक्के दराने जीएसटी लागू होईल आणि जर किंमत १,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर जीएसटीचा दर १२ टक्क्यांपर्यंत वाढेल.
लेखकाबद्दल
प्रियांका वर्तक
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर या पदावर मी कार्यरत आहे. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात तब्बल ७ वर्षाचा अनुभव आहे. क्रीडा पत्रकारितेवर विशेष प्रभूत्व असून व्यापार क्षेत्रातील बातम्यांच्या लिखाणाची आवड. भटकंतीसह बॅडमिंटन, क्रिकेट या खेळाची विशेष आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज