अ‍ॅपशहर

१७ हजार ९०० कोटींचा घोटाळा; ५१ घोटाळेबाज पसार

घोटाळे करून देशाबाहेर पसार झालेल्या घोटाळेबाजांबद्दल केंद्र सरकारने अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. आतापर्यंत असे ५१ घोटाळेबाज देश सोडून पसार झाले असून त्यांनी तब्बल १७ हजार ९०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात नमूद केले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Dec 2019, 6:24 am
नवी दिल्ली: घोटाळे करून देशाबाहेर पसार झालेल्या घोटाळेबाजांबद्दल केंद्र सरकारने अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. आतापर्यंत असे ५१ घोटाळेबाज देश सोडून पसार झाले असून त्यांनी तब्बल १७ हजार ९०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात नमूद केले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vijaymallya-niravmodi


अुनराग ठाकूर यांनी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) देण्यात आलेल्या तपशीलाच्या आधारे सभागृहात बड्या घोटाळेबाजांची माहिती दिली. आतापर्यंत ६६ मोठे घोटाळे उघड झाले असून या प्रकरणांतील ५१ आरोपी फरार आहेत. हे सर्व आरोपी अन्य देशांत लपून बसले आहेत, असेही या उत्तरातून स्पष्ट झाले आहे. या सर्वांनी मिळून एकूण १७ हजार ९४७.११ कोटी रुपयांचा अपहार केल्याचेही पुढे नमूद करण्यात आले आहे.

आर्थिक गैरव्यवहाराच्या या प्रकरणांत कुणाला सवलत देण्यात आली आहे का?, कुणाचे कर्ज माफ करण्यात आले आहे का?, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यावर ईडी व सीबीआयकडून संबंधित न्यायालयांत ही प्रकरणं नेण्यात आली आहेत. या प्रकरणांची सखोल चौकशी तसेच अन्य कारवाईही सुरू आहे, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.

रिझर्व्ह बँकेने दिली कर्जबुडव्या कंपन्यांची यादी

फरार आरोपींच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न केले जात आहेत. संबंधित देशांशी संपर्क साधण्यात आला आहे. ही प्रक्रिया सध्या प्रलंबित आहे, असेही ठाकूर यांनी पुढे नमूद केले. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) फरार आर्थिक गुन्हेगार विधेयक २०१८ अन्वये संबंधित न्यायालयात १० आरोपींविरुद्ध दावे दाखल केले आहेत. ८ आरोपींच्या प्रत्यार्पणाबाबत ईडीने विनंती अर्ज दाखल केले असून त्याआधारे इंटरपोलने या सर्वांना रेड-कॉर्नर नोटीस जारी केली आहे, अशी माहिती ठाकूर यांनी दिली.

दरम्यान, उद्योगपती विजय मल्ल्या, हिरेव्यापारी नीरव मोदी, मेहुल चोक्सी असे अनेक बडे घोटाळेबाज बँकांना हजारो कोटी रुपयांचा चुना लावून विदेशात पसार झाले आहेत. या सगळ्यांना भारतात परत आणण्याचे मोठे आव्हान सरकारपुढे असून यापैकी कुणीही अद्याप भारताच्या हाती लागलेलं नाही.

मला भारताकडे सोपवल्यास आत्महत्या करीन

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज