अ‍ॅपशहर

श्रीमंतांमध्ये आठ भारतीय महिला

फोर्ब्ज नियतकालिकाने जाहीर केलेल्या जगभरातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत यंदा २५६ महिलांचा समावेश झाला आहे. आतापर्यंतची ही सर्वाधिक संख्या आहे.

Maharashtra Times 8 Mar 2018, 10:36 am
नवी दिल्ली : फोर्ब्ज नियतकालिकाने जाहीर केलेल्या जगभरातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत यंदा २५६ महिलांचा समावेश झाला आहे. आतापर्यंतची ही सर्वाधिक संख्या आहे. या सर्व महिलांच्या एकत्रित मिळकत गेल्यावर्षीपेक्षा २० टक्क्यांनी वाढून एक लाख कोटी डॉलरवर पोहोचली आहे. यामध्ये स्वप्रयत्नांनी सर्वाधिक श्रीमंत महिलांमध्ये समावेश झालेल्या ७२ महिला आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 indian women billionaires in forbes list
श्रीमंतांमध्ये आठ भारतीय महिला


जगभरातील सर्वात श्रीमंत मिहलांमध्ये वॉलमार्टचे संस्थापक सॅम वॉल्टन यांची मुलगी अॅलिस वॉल्टन ही सर्वात श्रीमंत महिला ठरलू असून तिची मिळकत ४६ अब्ज डॉलर आहे. तिच्या खालोखाल लोरिएलची ३३ टक्के मालकी असलेल्या फ्रॅन्कोइस बेटेनकोर्ट व कुटुंबीय यांचा क्रमांक लागला आहे. यांचा १८वा क्रमांक लागला असून त्यांची मिळकत ४२.२० अब्ज डॉलर झाली आहे.

श्रीमंत भारतीय महिला

नाव.............................. मिळकत (डॉलर)............. जागतिक क्रमांक

सावित्री जिंदाल............... ८.८० अब्ज........................ १७६

किरण मझुमदार............. ३.६० अब्ज........................ ६२९

स्मिता क्रिश्ना गोदरेज....... २.९० अब्ज....................... ८२२

लीना तिवारी.................... २.४० अब्ज..................... १०२०

विनोद व अनिलराज गुप्ता... २.२० अब्ज.................... ११०३

अनु आगा........................ १.४० अब्ज......................१६५०

शीला गौतम................... १.१० अब्ज...................... १९९९

मधु कपूर........................ १.१० अब्ज..................... १९९९

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज