अ‍ॅपशहर

गोदरेज यांच्याकडून राजन यांची पाठराखण

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांना कार्यकाल वाढवून मिळावा, अशी इच्छा ज्येष्ठ उद्योगपती अदी गोदरेज यांनीही व्यक्त केली आहे.

Maharashtra Times 24 May 2016, 3:00 am
नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांना कार्यकाल वाढवून मिळावा, अशी इच्छा ज्येष्ठ उद्योगपती अदी गोदरेज यांनीही व्यक्त केली आहे. राजन यांना दुसऱ्यांदा गव्हर्नरपदाची संधी मिळाल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी ते चांगलेच असेल, असे गोदरेज यांनी नमूद केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम adi godrejs wish extension to rajan
गोदरेज यांच्याकडून राजन यांची पाठराखण


राजन यांचा गव्हर्नरपदाचा कार्यकाल सप्टेंबर २०१६मध्ये संपत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना दुसऱ्यांदा संधी द्यायची अथवा नाही या बद्दल चर्चांना उधाण आले आहे. भाजपचे खासदार आणि ज्येष्ठ नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी राजन यांना कार्यकाल वाढवून देण्यास विरोध केला आहे. ‘अन्य कुणी राजन यांच्याबाबत काहीही बोलत असेले, तर मला त्याविषयी काहीही बोलायचे नाही. मात्र, राजन यांनी तीन वर्षांत चांगले काम केले आहे. जगभरात फिरून त्यांनी मानसन्मान पटकावला आहे. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची शान त्यांनी वाढवली आहे, त्यामुळे त्यांना आणखी एक संधी द्यायला हवी,’ असेही गोदरेज यांनी स्पष्ट केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज