अ‍ॅपशहर

करदात्यांना योग्य सल्ला द्या

करदात्यांना आयकर भरण्याची तसेच कर अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची कोणत्याही प्रकारे भीती वाटू नये, यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष करमंडळाने (सीबीडीटी) कंबर कसली आहे. करदात्याला आयकर भरताना कोणतीही अडचम आली तर त्याच्या दंडात्मक कारवाई न करता त्याला योग्य सल्ला कर अधिकाऱ्यांने द्यावा, असा सल्लावजा आदेश सीबीडीटीने दिला आहे. करदाता निर्भय होऊन कर अधिकाऱ्यांकडे सल्ला मागण्यासाठी जाऊ शकेल, अशी ग्वाही सीबीडीटीच्या अध्यक्ष राणी सिंग नायर यांनी मंगळवारी येथे दिली. असोचेम संघटनेतर्फे आयोजित कर परिषदेत त्या बोलत होत्या.

Maharashtra Times 24 Aug 2016, 3:00 am
केंद्रीय प्रत्यक्ष करमंडळाचा कर अधिकाऱ्यांना आदेश
महाराष्ट्र टाइम्स.कॉम advise tax payers cbdt directs tax officials
करदात्यांना योग्य सल्ला द्या

वृत्तसंस्था, नवी दिल्ली
करदात्यांना आयकर भरण्याची तसेच कर अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची कोणत्याही प्रकारे भीती वाटू नये, यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष करमंडळाने (सीबीडीटी) कंबर कसली आहे. करदात्याला आयकर भरताना कोणतीही अडचम आली तर त्याच्या दंडात्मक कारवाई न करता त्याला योग्य सल्ला कर अधिकाऱ्यांने द्यावा, असा सल्लावजा आदेश सीबीडीटीने दिला आहे. करदाता निर्भय होऊन कर अधिकाऱ्यांकडे सल्ला मागण्यासाठी जाऊ शकेल, अशी ग्वाही सीबीडीटीच्या अध्यक्ष राणी सिंग नायर यांनी मंगळवारी येथे दिली. असोचेम संघटनेतर्फे आयोजित कर परिषदेत त्या बोलत होत्या.

करदात्याने आयकर विभागाला भिऊन असावे, असे वातावरण तयार करायचे नाही, असे नायर यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, त्यापेक्षा कोणत्याही करदात्याला कोणताही प्रश्न असेल तर त्याने हक्काने आयकर विभागाचा सल्ला घ्यावा हे महत्त्वाचे आहे. एखादा करदाता सल्ला मागण्यासाठी आल्यास त्या आयकर विभागातर्फे सर्वोत्कृष्ट सल्ला दिला जाईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. अमेरिका व यूको येथे करदात्याला अशा प्रकारे त्यांचे आयकर विभाग सल्ले देतात, अशाने करदाता व आयकर अधिकारी यांच्यात विश्वासाचे नाते तयार होईल, याकडेही नायर यांनी लक्ष वेधले.

ऑस्ट्रेलिया, अमेरिका व यूके या देशांतून करसल्ला देण्यासाठी स्वतंत्र, सर्वसमावेशक कायदे आहेत. परंतु आपल्या देशात मात्र आयसीएआय, बार कौन्सिल यासारख्या संस्था स्वयंनियमन करून त्यांच्या सदस्यांना योग्य सल्ला मिळावा यासाठी प्रयत्न करत आहेत. बदलत्या परिस्थितीत करदात्याला सल्ला मिळणे आणि तो योग्य असणे हे महत्त्वाचे आहे. असे झाल्यासच आयकर विभागातील प्रशासकीय कारभार स्वच्छ होईल, असे नायर यांचे म्हणणे आहे.

यादृष्टीने करविषयक कायद्यांमध्ये स्पष्टता आणण्याचे व पारदर्शकता आणण्याचे प्रयत्न सीबीडीटीने सुरू केले आहेत, जेणेकरून भारत हा उद्योजकांसाठी पसंतीचा देश बनेल. आंतरराष्ट्रीय स्तरावर करविषयक माहितीचे आदानप्रदान हा नवा मंत्र झाला आहे. दोन देशांमधील कंपन्यांमध्ये किंवा देशांमध्ये व्यवसायविषयक करार झाले असतील, तर अशा करारांचा वापर कर चुकवण्यासाठी केला जाऊ नये, हे करार संबंधित व्यवसायात सुलभता आणणारे होणे गरजेचे आहे. यासाठी सीबीडीटी वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची (एफएक्यू) उत्तरे संकेतस्थळावर प्रसिद्ध करेल, असेही नायर यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज