अ‍ॅपशहर

नोकर भरतीचा महापूर; जून महिन्यात इतक्या लोकांना मिळाला रोजगार!

करोना व्हायरस लॉकडाऊनच्या काळात अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. याचा परिणाम देशातील रोजगार निर्मितीवर झाला. गेल्या ३ महिन्यात अनेकांचे रोजगार गेले असले तरी आता नव्याने भरती सुरू झाली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Jul 2020, 4:53 pm
नवी दिल्ली: करोना लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले. अनेक ठिकाणी नोकर कपातीच्या बातम्या येत होत्या. आता देशात पुन्हा अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि त्याच बरोबर नोकर भरतीची प्रक्रिया सुरू झाली. मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये नोकर भरतीची मध्ये ३३ टक्के इतकी वाढ झाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम नोकर भरती


वाचा- 'या' बँकेने दिली ८० हजार जणांना पगार वाढ; करोना संकटात काम केल्याचे बक्षिस!

जॉबस्पीक इंडेक्स जूनमध्ये १ हजार २०८ इतकावर गेला. तो मे महिन्यात ९१० होता. मे महिन्याच्या तुलनेत ३३ टक्के वाढ झाली आहे. अर्थात गेल्या वर्षाच्या जून महिन्याशी तुलना करता यात ४४ टक्के इतकी घट आहे. नोकरी जॉबस्पीक एका महिन्याचा इंडेक्स आहे जो नोकरी डॉट कॉम मधील जॉब लिस्टिंगच्या आधारे तयार केला जातो.

वाचा- कर्ज झाली स्वस्त ; सर्वात मोठ्या बँकेने केली व्याजदर कपात

या रिपोर्टनुसार करोना लॉकडाऊनच्या काळात सर्वाधिक फटका रुग्णालय, रिटेल, ऑटो सेक्टरला बसला आहे. लॉकडाऊनच्या नियमात सूट दिल्यानंतर या सर्व सेक्टरमध्ये पुन्हा एकदा नोकर भरती सुरू झाली. जून मध्ये सरकारने अनलॉक १ सुरू केले. यामुळे नोकर भरती सुरू झाली आहे. रुग्णालयात मे महिन्याच्या तुलने जूनमधीर भरती १०७ टक्के वाढ झाली, रिटेल आणि ऑटो सेक्टरमध्ये ७७ टक्के इतकी वाढ झाली आहे.

वाचा- छप्पर फाड़ के; करोना काळात भारतीय कंपनीने कमवले ९७ हजार ४०० कोटी!

नोकरी डॉट कॉमचे मुख्य बिझनेस ऑफिसर पवन गोयल म्हणाले, ही गोष्टी खुप उत्साहजनक होती. अनलॉक १च्या घोषणेनंतर देशात नोकर भरती पुन्हा वेगाने सुरू झाली. गेल्या वर्षी जूनमध्ये झालेल्या नोकर भरतीपेक्षा यावर्षीचे प्रमाण ४४ टक्क्यांनी कमी झाले असले तरी आयटी, बीपीओ, आयटीईएस आणि एफएमसीजी तसेच अकाऊंटिंग सेक्टरमध्ये या वर्षी गेल्या जून पेक्षा अधिक भरती झाली आहे.

वाचा- 'या' कंपनीचा शेअर ३ हजार डॉलरवर; CEO झाला मालामाल!

पुढील काही महिन्यात पुन्हा परिस्थिती सामान्य होईल अशी आशा आहे. शिक्षण क्षेत्रात ४९ टक्के, फार्मा आणि बायोटेक सेक्टरमध्ये ३६ टक्के आणि सेल्स, बिझनेस सेक्टरमध्ये मासिक आधारावर ३३ टक्के वाढ झाली आहे. सर्व सेक्टरमध्ये अनुभवी लोकांच्या भरतीत २८ टक्के वाढ झाली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज