अ‍ॅपशहर

जीएसटीमुळे ‘अॅपल’चे स्मार्टफोन स्वस्त

जीएसटी लागू झाल्यानंतर अॅपल कंपनीने त्यांच्या उत्पादनांच्या किमतीत कपात केली आहे. आयफोनसह आयपॅड, मॅक आदींचा यामध्ये समावेश आहे.

Maharashtra Times 3 Jul 2017, 3:00 am
नवी दिल्ली ः जीएसटी लागू झाल्यानंतर अॅपल कंपनीने त्यांच्या उत्पादनांच्या किमतीत कपात केली आहे. आयफोनसह आयपॅड, मॅक आदींचा यामध्ये समावेश आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम apple will be cheaper
जीएसटीमुळे ‘अॅपल’चे स्मार्टफोन स्वस्त


आयफोन ७ प्लस (२५६ जीबी) हा आता ८५,४०० रुपयांना मिळेल. यापूर्वी तो ९२ हजार रुपयांना मिळत असे. आयफोन एसी (१२८ जीबी) याच्या किमतीत २२०० रुपयांनी घट होऊन त्याची किंमत ३५ हजार रुपये झाली आहे. कंपनीच्या वेबसाइटवर नव्या किमती झळकल्या असून पहिल्यापेक्षा नव्या किमतींमध्ये ७.२ टक्क्यांची घट आहे. १२.९ इंच आयपॅड प्रो (५१२ जीबी) एक लाख रुपयांऐवजी ९७ हजार रुपयांना मिळेल. या किमतींच्या कपातींबाबत मात्र अॅपलने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या किमती जीएसटीमुळेच कमी झाल्या, असे ठामपणे म्हणता येणार नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज