अ‍ॅपशहर

अॅक्सिस बँकेच्या शाखा वाढणार

खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेतर्फे चालू आर्थिक वर्षात देशभरात ३५० ते ४०० शाखा नव्याने उघडण्यात येण्याची शक्यता आहे. बँकेच्या वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली.

Maharashtra Times 11 Aug 2018, 12:43 am
हैदराबाद : खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेतर्फे चालू आर्थिक वर्षात देशभरात ३५० ते ४०० शाखा नव्याने उघडण्यात येण्याची शक्यता आहे. बँकेच्या वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम axis


'सध्या देशभरात बँकेच्या ३८०० शाखा कार्यरत आहेत. गेल्या वर्षी यात ४०० शाखांची भर पडली. या पार्श्वभूमीवर चालू आर्थिक वर्षात नव्याने ३५० ते ४०० शाखांची भर पडण्याची शक्यता आहे. पहिल्या तिमाहीत आम्ही ७६ शाखा सुरू केल्या,' अशी माहिती अॅक्सिस बँकेचे कार्यकारी संचालक (रिटेल बँकिंग) राजीव आनंद यांनी दिली. बँकेचा सर्वाधिक विस्तार तेलंगणमध्ये झाला असून, सध्या राज्यात १२३ शाखा आणि ७३१ एटीएम आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज