अ‍ॅपशहर

बॅगेज शुल्काचा निर्णय राखून ठेवला

विमानतळावर निःशुल्क सामानाव्यतिरिक्त अतिरिक्त सामान असल्यास त्यासाठी प्रति किलो १०० रुपये शुल्क आकारणीचा नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) दिलेला आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे.

Maharashtra Times 17 Aug 2017, 3:00 am
नवी दिल्ली ः विमानतळावर निःशुल्क सामानाव्यतिरिक्त अतिरिक्त सामान असल्यास त्यासाठी प्रति किलो १०० रुपये शुल्क आकारणीचा नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) दिलेला आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम baggage charges
बॅगेज शुल्काचा निर्णय राखून ठेवला


विमानतळावर १५ किलोपर्यंतचे सामान निःशुल्क नेता येत आहे. त्यापुढील पाच किलो सामानासाठी प्रतिकिलो १०० रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय डीजीसीएने घेतला होता. यासाठी डीजीसीएने १० जून रोजी अधिसूचना जारी केली होती. त्यानुसार या शुल्काची अंमलबजावणी १ जुलैपासून सुरूही जाली होती. यापूर्वी हे शुल्क २२० ते ३५० रुपये होते. परंतु या शुल्काला आक्षेप घेत न्यायाधीश विभू बखरू यांनी डीजीसीएचा निर्णय राखून ठेवला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज