अ‍ॅपशहर

RBI: ... म्हणून रविवारी सर्व सरकारी बँका सुरू राहणार

चालू आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे ३१ मार्च येत्या रविवारी येत आहे. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने कामकाजासाठी देवाण-घेवाण करणाऱ्या देशभरातील सर्व सरकारी बँका रविवारी सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Mar 2019, 8:47 am
नवी दिल्ली: चालू आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे ३१ मार्च येत्या रविवारी येत आहे. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने कामकाजासाठी देवाण-घेवाण करणाऱ्या देशभरातील सर्व सरकारी बँका रविवारी सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम reserve-banks


आरबीआयने एक परिपत्रक काढून सर्व सरकारी बँकांना तसे निर्देश दिले आहेत. त्यात सर्व पे अँड अकाऊंट कार्यालय सुरू राहणार असल्याने ३१ मार्च २०१९ रोजी सर्व सरकारी बँका सुरू ठेवण्यात याव्यात असं म्हटलं आहे. या बँकाच्या शाखांमधील देवाण-घेवाणीचे व्यवहार ३० मार्च रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते ३१ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच RTGS आणि NEFT सहित इलेक्ट्रॉनिक देवाण-घेवाणही ३० आणि ३१ मार्च रोजी वाढवण्यात आलेल्या वेळेपर्यंत सुरू राहणार असल्याचंही या परिपत्रकात नमूद करण्यात आलंय.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज