अ‍ॅपशहर

बँक अहोरात्र सुरू राहिल

सरकारने ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा रद्दबातल करण्यास सांगितले आहे. अशा प्रकारे नोटा चलनातून काढून टाकण्याची परिस्थिती आम्ही यापूर्वी हाताळली आहे.

Maharashtra Times 10 Nov 2016, 3:00 am
सरकारने ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा रद्दबातल करण्यास सांगितले आहे. अशा प्रकारे नोटा चलनातून काढून टाकण्याची परिस्थिती आम्ही यापूर्वी हाताळली आहे. तसाच प्रकारे प्रभावीरीत्या ही परिस्थितीदेखील आम्ही हाताळणार आहोत. बुधवारी या नोटा एटीएम व काउंटर येथून काढून टाकण्यासाठी सर्व बँका बंद राहणार आहेत. सरकारने रद्द ठरवलेल्या नोटा बदलण्यासाठी नागरिकांना पुरेसा कालावधी दिला आहे. यासाठी आम्ही अहोरात्र काम करणार आहोत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम banks industry welcome demonetisation of 500 1000 notes
बँक अहोरात्र सुरू राहिल

-० अरुंधती भट्टाचार्य, अध्यक्ष, भारतीय स्टेट बँक
..
निर्णयाचे स्वागत
हा निर्णय अत्यंत आवश्यक असाच होता. समाजात रोकड साठवून ठेवण्याची वृत्ती वाढत असताना त्याला आळा घालणे गरजेचे होते. सरकारच्या या निर्णयाला ामचा संपूर्ण पाठिंबा आहे.
नवीन सूर्या, अध्यक्ष, पेमेंट कौन्सिल ऑफ इंडिया
..
महत्त्वपूर्ण निर्णय

या निर्णयामुळे पेमेंटचे सर्व मार्ग सक्षम होतील. समांतर अर्थव्यवस्था कमी करण्याचा हा उपाय आहे.
-० चंदा कोचर, अध्यक्ष, आयसीआयसीआय बँक

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज