अ‍ॅपशहर

आजच पूर्ण करा बँकेची काम नाहीतर होईल मोठा खोळंबा; या कारणामुळे एटीएममध्येही नसतील पैसे

Bank Strike - ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने १९ नोव्हेंबर रोजी संपाची घोषणा केली आहे. यानंतर रविवारी बँका बंद राहतील, यामुळे बँकांच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो.

Authored byभक्ती गुरव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Nov 2022, 2:07 pm
मुंबई: बँकमधील तुमचे कोणते काम शिल्लक राहिले असेल तर ते आजचा जाऊन पूर्ण करून घ्या. नाहीतर नंतर आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. खरं तर, ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (ATBEA) ने १९ नोव्हेंबर रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. त्यामुळे बँकेतील कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे. बँक कर्मचारी संघटनेने (AIBEA) आपल्या मागण्यांसंबंधित हा संप पुकारला आहे. बँक ऑफ बडोदाने एक निवेदन जारी केले आहे की त्यांना AIBEA कडून नोटीस मिळाली आहे. १९ नोव्हेंबरला बँक संपावर जाण्याचा निर्णय सदस्यांनी घेतला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Bank strike on 19th nov


वाचा: टाटा समूहाची मोठी तयारी... पुन्हा एकदा सौंदर्य आणि पर्सनल केअर मार्केटमध्ये उतरणार, ही आहे योजना

म्हणून संप पुकारण्यात आला....

ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने बँकांच्या खासगीकरणाविरोधात आणि बँक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंदर्भातील मागण्यांसाठी संप पुकारला आहे. त्यामुळे लग्नाच्या या मोसमात बँकांच्या संपामुळे ग्राहकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. बँकांच्या या संपामुळे कामकाजात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. शनिवारी बँक संपानंतर रविवारी बँका बंद राहणार आहेत. अशा स्थितीत २ दिवस कामकाजावर परिणाम होणार आहे. येता शनिवार हा महिन्यातील तिसरा शनिवार आहे. या दिवशी बँकेला सुट्टी नसते. संपामुळे, काही एटीएममध्ये रोखीची समस्या असू शकते. जर तुम्हाला गैरसोय टाळायची असेल, तर तुम्ही एटीएममधून एक दिवस अगोदर पैसे काढू शकता.

हेेही वाचा: नोकरदारांच्या कामाची बातमी! जाणून घ्या UAN क्रमांक कसा सक्रिय करायचा, चेक करा सोपी पद्धत

नोव्हेंबर महिन्यातील बँकेच्या सुट्ट्या

२० नोव्हेंबर २०२२
यादिवशी रविवार असल्याने बँका बंद राहतील.

२६ नोव्हेंबर २०२२
यादिवशी चौथा शनिवार असल्याने बँकांना सुट्टी असेल.

२७ नोव्हेंबर २०२२
यादिवशी रविवार असल्याने बँका बंद राहतील.

२३ नोव्हेंबर २०२२
यादिवशी सेंग कुत्सनेम सुरु असल्याने शिलॉंगसोडून इतर सर्व ठिकाणी बँकांचे कामकाज सुरू असेल. फक्त यादरम्यान शिलॉंगमध्ये बँक बंद असतील.
लेखकाबद्दल
भक्ती गुरव
"भक्ती गुरव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. क्रीडासोबतच अर्थविषयक बातम्यांमध्ये रस."... आणखी वाचा

महत्वाचे लेख