अ‍ॅपशहर

८ तारखेला गुरु नानक जयंतीनिमित्त बँक हॉलिडे, तर नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका बंद राहणार, जाणून घ्या

Bank Holiday November - नोव्हेंबर महिन्यात बँका एकूण १० दिवस बंद राहतील. आरबीआयच्या नियमांनुसार दर रविवारी तसेच महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात.

Authored byभक्ती गुरव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Nov 2022, 12:35 pm
मुंबई: दिवाळीनंतर आता नोव्हेंबर महिन्यात देशभरातील बँका जवळपास १० दिवस बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या सुट्टीच्या कॅलेंडरवरून ही माहिती मिळाली आहे. ३० दिवसांच्या नोव्हेंबर महिन्यात अनेक सण आहेत, त्यामुळे बँकांना सुट्ट्या असतील.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम November Bank Holiday


८ नोव्हेंबरला गुरु नानक जयंती असून अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील. मात्र त्रिपुरा, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, सिक्कीम, आसाम, मणिपूर, केरळ, गोवा, बिहार आणि मेघालय या राज्यांमध्ये बँका बंद राहणार नाहीत.

वाचा: Twitter मधील टाळेबंदीवर को-फाउंडर जॅक डोर्सी यांनी सोडले मौन; म्हणाले- 'याला मी जबाबदार आहे...'

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या यादीनुसार बँकेच्या सुट्ट्या निश्चित होत असतात. त्या यादीनुसार नोव्हेंबर महिन्याच्या सुट्ट्यांची संख्या १० ठेवण्यात आली आहे. यामध्ये दुसरा आणि चौथा शनिवार तसेच महिन्याच्या प्रत्येक रविवारचा समावेश होतो. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी बँका नेहमीप्रमाणे सुरू असतील.

नोव्हेंबरमध्ये गुरु नानक जयंतीसारखे अनेक सण

नोव्हेंबर महिन्यात गुरु नानक जयंती, कार्तिक पौर्णिमा, रहस पौर्णिमा, कनकदास जयंती, वांगला उत्सव, कन्नड राज्योत्सव, कुट उत्सव आणि सेंग कुत्सानेम यांसारखे सण आहेत. कारण यातील बहुतांश सण हे प्रादेशिक आहेत. त्यामुळे या विशेष दिवशी भारतातील बहुतांश बँका खुल्या राहतील. ज्या राज्यांमध्ये हे प्रादेशिक सण साजरे केले जातात, त्याच बँका एकाच वेळी बंद राहतील.

हेही वाचा: ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना काढून टाकणं इतकं सोपं नाही! एलन मस्क पुन्हा अडचणीत येणार..

दुसरा शनिवार, रविवार व्यतिरिक्त RBI ने १,८,११ आणि २३ नोव्हेंबरला सुट्टी जाहीर केली आहे. भारतातील बँका ११ नोव्हेंबर २०२२ रोजी म्हणजे शुक्रवारी कनकदास जयंती/वंगाळा उत्सवानिमित्त बंद आहेत. या दिवशी फक्त कर्नाटक, मेघालयमध्ये बँका बंद असतात. इतर राज्य बँका काम करतील.

सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये अनेक दिवस बँका बंद होत्या. वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्वतंत्रपणे, बँका ऑक्टोबर २०२२ मध्ये दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवार यासह एकत्रितपणे २१ दिवस बंद राहतील.
लेखकाबद्दल
भक्ती गुरव
"भक्ती गुरव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. क्रीडासोबतच अर्थविषयक बातम्यांमध्ये रस."... आणखी वाचा

महत्वाचे लेख