अ‍ॅपशहर

बँकांनी पाच वर्षांत १० लाख कोटींच्या कर्जावर पाणी सोडले, जाणून घ्या कोणत्या कंपनीकडे किती थकबाकी

Bank Loan Write Off : २०२०-२१ मध्ये सर्वाधिक विलफुल डिफॉल्टर होते. त्या काळात २,८४० जणांनी कर्ज फेडले नाही. पुढच्या वर्षी ही संख्या २,७०० होती. मार्च २०१९ अखेर अशा थकबाकीदारांची संख्या २,२०७ होती, जी २०१९-२० मध्ये वाढून २,४६९ झाली.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Aug 2022, 12:54 pm
मुंबई : देशातील बँकांनी गेल्या पाच वर्षांत सुमारे तब्बल लाख कोटी रुपयांची कर्जे माफ केली आहेत. अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. कराड म्हणाले की, २०२१-२२ या आर्थिक वर्षात बँकांची बु़डीत खात्यातील रक्कम मागील आर्थिक वर्षातील २,०२,७८१ कोटी रुपयांच्या तुलनेत १,५७,०९६ कोटी रुपयांवर आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Indian currency


वर्ष २०१९-२० मध्ये ही रक्कम २,३४,१७० कोटी रुपये होती, जी २०१८-१९ मधील २,३६०,२६५ कोटी रुपयांच्या पाच वर्षांच्या विक्रमी पातळीपेक्षा कमी होती. २०१७-१८ मध्ये बँकांनी १,६१,३२८ कोटी रुपये राइट ऑफ केले होते. गेल्या पाच आर्थिक वर्षांत (२०१७-१८ ते २०२१-२२) एकूण बँकांनी एकूण ९,९१,६४० कोटी रुपयांची कर्जे माफ केली असल्याचे कराड यांनी सांगितले.

वाचा - केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट मिळणार, महागाई भत्ता ४ टक्केंनी वाढणार? या महिन्यापासून निर्णय लागू?

गेल्या चार वर्षांत कर्ज बुडवणाऱ्यांची संख्या १०,३०६ असल्याची माहिती कराड यांनी दिली. २०२०-२१ मध्ये सर्वाधिक विलफुल डिफॉल्टर होते. त्या काळात २,८४० जणांनी कर्ज फेडले नाही. पुढच्या वर्षी ही संख्या २,७०० होती. मार्च २०१९ अखेर अशा थकबाकीदारांची संख्या २,२०७ होती, जी २०१९-२० मध्ये वाढून २,४६९ झाली. मार्च २०२२ पर्यंतच्या टॉप २५ डिफॉल्टर्सचे तपशील शेअर करताना कराड म्हणाले की, गीतांजली जेम्स लिमिटेड या यादीत अग्रस्थानी आहे. त्यापाठोपाठ Era Infra Engineering, Concast Steel & Power, REI Agro Limited आणि ABG शिपयार्ड लिमिटेड यांचा क्रमांक लागतो.फरारी हिरे व्यापारी मेहुल चोक्सीची कंपनी गीतांजली जेम्सवर बँकांचे ७,११० कोटी रुपये आहे.

वाचा - तुमच्या पगारावर किती लोन मिळेल, जाणून घ्या काय आहेत RBI ची मार्गदर्शक तत्वे

कोणत्या कंपन्यांची किती थकबाकी
गीतांजली जेम्स लिमिटेड – ७,११० कोटी
एरा इन्फ्रा इंजिनिअरिंग – ५.८७९ कोटी
कॅनकास्ट स्टील अँड पॉवर लिमिटेड - ४,१०७ कोटी
आरइआइ अॅग्रो लिमिटेड Limited - ३,९८४ कोटी
एबीजी शिपयार्ड - ३,७०८ कोटी
फ्रॉस्ट इंटरनॅशनल लिमिटेड - ३,१०८ कोटी
विन्सम डायमंड्स अँड ज्वेलरी - २,६७१ कोटी
रोटोमॅक ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड - २,४८१ कोटी
कोस्टल प्रोजेक्ट्स लिमिटेड - २,३११ कोटी
कुडोस केमिकल - २,०८२ कोटी

महत्वाचे लेख