अ‍ॅपशहर

जीएसटीसाठी बिग बी ब्रॅण्ड अॅम्बेसेडर

१ जुलैपासून लागू होणाऱ्या वस्तू सेवा कर अर्थात जीएसटीच्या प्रमोशनसाठी बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने अमिताभ बच्चन यांचा ४० सेकंदाचा व्हिडीओ ट्विट केला आहे.

Maharashtra Times 19 Jun 2017, 7:59 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम big b for big t govt ropes in amitabh bachchan to promote gst
जीएसटीसाठी बिग बी ब्रॅण्ड अॅम्बेसेडर


१ जुलैपासून लागू होणाऱ्या वस्तू सेवा कर अर्थात जीएसटीच्या प्रमोशनसाठी बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने अमिताभ बच्चन यांचा ४० सेकंदाचा व्हिडीओ ट्विट केला आहे.

भारताच्या राष्ट्रध्वजातील तिरंग्यातील तीन रंगांप्रमाणे जीएसटी ही एकत्रित शक्ती असून जीएसटी ‘एक राष्ट्र, एक कर, एक बाजारपेठ’ निर्माण करण्यासाठी घेतलेला पुढाकार असल्याचा संदेश या व्हिडिओद्वारे देण्यात आला आहे. केंद्रीय जकात आणि सीमाशुल्क विभागाने अमिताभ बच्चन यांची नियुक्ती ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून केली आहे. जीएसटी हा ‘एक राष्ट्र, एक कर, एक बाजारपेठ’ निर्माण करण्यासाठी घेतलेला पुढाकार आहे, असं अमिताभ बच्चन व्हिडिओमध्ये सांगत आहेत. अमिताभ बच्चन यांच्या आधी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू जीएसटीसाठी ब्रॅण्ड अॅम्बेसेडर होती.



GST - An initiative to create a unified national market. #OneNationOneTaxOneMarket pic.twitter.com/Cti76a8KUF — Ministry of Finance (@FinMinIndia) June 19, 2017   जीएसटीमुळे देशातील अन्य कर आता संपुष्टात येणार असून एकच कर लागू होणार आहेत. कर दर ठरवण्यासाठी जीएसटी कौन्सीलच्या १७ बैठका पार पडल्या आहेत

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज