अ‍ॅपशहर

Layoffs News: एका झटक्यात कर्मचाऱ्यांनी गमावली नोकरी; वाचा झालं तरी काय

IT Firm Accenture Fires Employees : माहिती तंत्रज्ञान सेवा पुरवणारी दिग्गज कंपनी एक्सेंचरने (Accenture) ने भारतात काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. या कर्मचाऱ्यांनी बनावट कागदपत्रे तयार करून नोकऱ्या मिळवल्याचा आरोप आहे. अधिकाऱ्यांकडून नेमक्या आकड्यांची खात्री अद्याप केलेली नाही. मोठ्या संख्येने लोकांनी नोकरीसाठी बनावट अनुभवपत्रे (Fake Experience Letters) लावली होती.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Nov 2022, 11:07 am
नवी दिल्ली : भारतातील आघाडीच्या माहिती तंत्रज्ञान (IT) कंपन्यांपैकी एक असलेल्या एक्सेंचरने आपल्या अनेक कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. कंपनीने आयटी जॉब क्षेत्रातील घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोठ्या संख्येने लोकांनी नोकरीसाठी बनावट अनुभवपत्रे (Fake Experience Letters) लावली होती.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Accenture India


Elon Musk यांना उशीरा शहाणपण आलं, आधी अर्ध्या ट्विटर कर्मचाऱ्यांना घरी पाठवलं, आता म्हणतात...
काम करण्याच्या क्षमतेवर परिणाम नाही
कंपनीचे म्हणणे आहे की, “आम्ही व्यावसायिक नीतिशास्त्राच्या कठोर संहितेच्या अंतर्गत कार्य करतो आणि कोणत्याही गैर-अनुपालन सहन करत नाही. भारतातील Accenture कडून रोजगार मिळविण्यासाठी आम्ही फसव्या कंपन्यांकडून कागदपत्रे आणि अनुभव पत्रे वापरण्याचा प्रयत्न उघडकीस आणला आहे. परिणामी, आम्ही या योजनेचा लाभ घेतल्याची पुष्टी करणारे लोक बाहेर पडले आहेत. आमच्या ग्राहकांना सेवा देण्याच्या आमच्या क्षमतेवर कोणताही परिणाम होणार नाही याची खात्री करण्यासाठी आम्ही कारवाई केली आहे. आम्ही पात्र उमेदवारांसाठी नियुक्त करणे सुरू ठेवत आहोत आणि विद्यमान नोकरीच्या ऑफरचा सन्मान करत आहोत,” असे कंपनीचे म्हणणे आहे.

Twitter मधील टाळेबंदीवर को-फाउंडर जॅक डोर्सी यांनी सोडले मौन; म्हणाले- 'याला मी जबाबदार आहे...'
पात्रतेनुसारच नोकरी
कंपनीच्या म्हणण्यानुसार, एक्सेंचरमध्ये नोकरीसाठी कोणत्याही एजन्सी किंवा कंपनीला अधिकृत करण्यात आलेले नाही. लोकांनी अशा कंपन्यांना बळी पडू नये. एक्सेंचरमधील नोकऱ्या गुणवत्तेवर आधारित आहेत. कंपनी भरती प्रक्रियेसाठी कोणतेही शुल्क आकारत नाही.

ट्विटरच्या भारतीय कर्मचाऱ्यांची कामावरून 'सुट्टी', एका झटक्यात पूर्ण मार्केटिंग टीम 'आऊट'
कंपनीचा इशारा
कंपनीने लोकांना सावध करताना म्हटले की, एक्सेंचरमध्ये नोकरीसाठी कोणतेही पैसे देण्याची गरज नाही. जर कोणी एक्सेंचरमध्ये
नोकरी करण्यासाठी पैशांची मागणी करीत असेल तर सावधगिरी बाळगा. आणि त्यांची माहिती कंपनीच्या योग्य यंत्रणेपर्यंत पोहचवा.

महत्वाचे लेख