अ‍ॅपशहर

बायो-मिथेनची बस विकसित

टाटा मोटर्सने पर्यावरणपूरक बायो-सीएनजी (बायो-मिथेन) बस विकसित केली आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या उपस्थितीत नुकत्याच या बसचे अनावरण करण्यात आले.

Maharashtra Times 18 Jul 2017, 3:00 am
मुंबई : टाटा मोटर्सने पर्यावरणपूरक बायो-सीएनजी (बायो-मिथेन) बस विकसित केली आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या उपस्थितीत नुकत्याच या बसचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय ऊर्जा आणि कोळसा मंत्री पियूष गोयल उपस्थित होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bio methene bus
बायो-मिथेनची बस विकसित


टाटा मोटर्सने एलसीव्ही, आयसीव्ही आणि एमसीव्ही बससाठी बायो-मिथेन इंजिन (५.७ एसजीआय आणि ३.८ एसजीआय) विकसित तसेच तयार केले आहे. या कार्यक्रमादरम्यान टाटा मोटर्सने ५.७ एसजीआय एनए बीएसआयव्ही आयओबीडी-२ युक्त बसेससह आपल्या टाटा एलपीओ १६१३ या प्रमुख मॉडेलसह तीन इंजिने सादरकेली. टाटा एलपीओ १६१३ हे इंजिन यापूर्वीच पीएमपीएमएल (पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड) मध्ये कार्यरत झाले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज