अ‍ॅपशहर

माधुरी दीक्षितने घेतले ४८ कोटींचे आलिशान अपार्टमेंट, भरले २.४ कोटी मुद्रांक शुल्क

Madhuri Dixit Nene New Property in Mumbai: सुमारे प्रति चौरस फूट ९० हजार रुपयांना हा व्यवहार झाला आहे. हा या वर्षातील सर्वात महागडा व्यवहार आहे. माधुरीचे हे घर टॉवर सी मध्ये ५३ व्या मजल्यावर आहे. माधुरीचे नवीन लक्झरी अपार्टमेंट वरळीच्या डॉ. ई मोसेस रोडवरील इंडियाबुल्स ब्लू या सुपर प्रीमियम निवासी प्रकल्पात आहे.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Oct 2022, 12:35 pm
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने मुंबईतील वरळी भागात ४८ कोटी रुपयांचे आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे (Madhuri Dixit has bought a Luxurious Apartment). ५३ व्या मजल्यावर असलेल्या या अपार्टमेंटमधून अरबी समुद्र आणि महालक्ष्मी रेसकोर्सचे विहंगम दृश्य दिसते. माधुरीने हे लक्झरी अपार्टमेंट वरळीच्या डॉ. ई मोसेस रोडवरील इंडियाबुल्स ब्लू या सुपर प्रीमियम निवासी प्रकल्पात घेतले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Madhuri Dixit New house inside photos
माधुरी दीक्षितने मुंबईतील वरळी भागात नवीन घर घेतले आहे. फोटो: Instagram


भारतातील सर्वात श्रीमंत CEOने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर, किंमत आहे इतके कोटी
आलिशान निवासी प्रकल्प
सुमारे प्रति चौरस फूट ९० हजार रुपयांना हा व्यवहार झाला आहे. हा या वर्षातील सर्वात महागडा व्यवहार आहे. माधुरीचे हे घर टॉवर सी मध्ये ५३ व्या मजल्यावर असून ते ५,३८४ स्क्वेअर फूटमध्ये पसरले आहे. अनेक व्यावसायिक आणि उद्योजकांनी इंडियाबुल्स ब्लूमध्ये अपार्टमेंट्सही खरेदी केले आहेत. १० एकरमध्ये पसरलेल्या या आलिशान निवासी प्रकल्पाचे १०० कोटी रुपयांपर्यंतचे व्यवहार झाले आहेत. माधुरीच्या लक्झरी अपार्टमेंटची २८ सप्टेंबर रोजी नोंदणी झाली आणि तिने त्यावर २.४ कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरले. महाराष्ट्र सरकारच्या नवीन नियमांनुसार महिलांना मुद्रांक शुल्कात एक टक्का सूट मिळते. या अपार्टमेंटसह माधुरीला कारसाठी सात पार्किंग स्लॉट देण्यात आला आहे.

अबब! वरळीत १५१ कोटींना दोन फ्लॅट, मुंबईच्या रियल इस्टेटमधील सर्वात मोठा व्यवहार?
अपार्टमेंट भाडेतत्त्वावर
माधुरीने गेल्या वर्षी याच प्रकल्पात २९व्या मजल्यावर ५,५०० स्क्वेअर फूटचे एक अपार्टमेंट भाडेतत्त्वावर घेतले होते. हे अपार्टमेंट ३६ महिन्यांसाठी भाडेतत्त्वावर घेतले होते. दीक्षित-नेने कुटुंबीयांनी या अपार्टमेंटच्या आतील बाजूचे कामही सुरू केले होते. या सदनिकेचे भाडे सुरू राहणार की रद्द करण्यात आले हे स्पष्ट नाही.

घर खरेदीच्या विचारात आहात? पत्नीची साथ घेतल्यास गृहकर्जाचं ओझं वाटणार नाही, मिळतात भरघोस फायदे
६१ कोटींचे घर
गेल्या महिन्यात फार्मास्युटिकल कंपनी एरिस लाइफसायन्सेसचे अध्यक्ष आणि एमडी अमित बक्षी यांनी वरळीच्या ३ सिक्स्टी वेस्ट प्रकल्पात ६१ कोटी रुपयांचे घर विकत घेतले. ३०व्या मजल्यावर असलेल्या या अपार्टमेंटचा सौदा ९४,५०० रुपये प्रति चौरस फूट दराने झाला होता. महाराष्ट्र सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मुंबईत मुद्रांक शुल्कात सूट दिली होती. ही सूट ३१ मार्च २०२१ पर्यंत देण्यात आली होती. या काळात शहरातील मालमत्तांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली आहे.

महत्वाचे लेख