अ‍ॅपशहर

करोना काळात वाढली उत्पादनांची मागणी, महिन्याला होईल मोठी कमाई; वाचा व्यवसायाची सविस्तर माहिती

Business Idea: खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) औषधीयुक्त तूप बनवण्याच्या व्यवसायावर एक अहवाल तयार केला आहे. यामध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारा खर्च आणि नफा याचा अंदाज लावला आहे. करोनाच्या काळात ही मागणी खूप वाढली आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही सरकारकडून कर्जही घेऊ शकता.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Nov 2022, 5:15 pm
नवी दिल्ली: करोनानंतर लोकांमध्ये त्यांच्या आरोग्याबाबत जागरुकता वाढली आहे. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक उत्पादनांची विक्री वाढली असून नवीन स्टार्टअप्सही सुरू झाले आहेत. तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही औषधी तूप (Medicated ghee) बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. करोनाच्या काळात ही मागणी खूप वाढली आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही सरकारकडून कर्जही घेऊ शकता. या व्यवसायाबद्दल सविस्तर माहिती घेऊ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Medicated Ghee Business Idea


कमाईची भन्नाट कल्पना! वर्षभरात लाखो रुपये कमवाल, घराच्या छतापासून करू शकता सुरुवात
तुपाचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. औषधी तूप काळी मिरी, बडीशेप, पिपली इत्यादीपासून बनवले जाते. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) औषधीयुक्त तूप बनवण्याच्या व्यवसायाचा अहवाल तयार केला आहे. यामध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारा खर्च, खर्च आणि नफा याचा अंदाज लावला आहे.

भन्नाट संधी! देशातील मोठ्या कंपनीसोबत सुरू करा व्यवसाय, पहिल्या दिवसापासून होईल बक्कळ कमाई
प्रकल्प खर्च
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने औषधीयुक्त तूप बनविण्याच्या व्यवसायावर तयार केलेल्या अहवालानुसार, व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूण अंदाजित खर्च ४.८० लाख रुपये इतका आहे. प्रकल्प अहवालानुसार संबधित जमीन व्यवसायिकाच्या मालकीची असावी. १००० चौरस फूट इमारतीचे शेड बांधण्यासाठी २,००,००० रुपये खर्च येऊ शकतो. उपकरणे (Volumetric Ghrita filling Machine, Bottle Washing, Drying Machine इ.) ची किंमत १,८०,००० रुपयांपर्यंत असू शकते. एकूण भांडवली खर्च ३,८०,००० येऊ शकतो. १,०५,००० च्या खेळत्या भांडवलासह, एकूण प्रकल्पाची अंदाजित किंमत ४८,५०० रुपये आहे.

चहा प्या आणि बिल Cryptocurrency मध्ये भरा; क्रिप्टोच्या झुनझुनवालाने सुरु केलंय चहाचे दुकान
किती कमावता येईल?
आयोगाच्या अहवालानुसार, वर्षाला ४०,०० किलो औषधीयुक्त तूप तयार केले जाऊ शकते. त्याची एकूण किंमत १२,५६,२०० रुपये असू शकते. १०० टक्के उत्पादनावर अंदाजित विक्री १,५०,००० रुपये असेल. यातून खर्च वजा केल्यास २,३४,८०० रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. आयोगाने सांगितले की हे आकडे अंदाजित आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणांनुसार त्यात बदल होऊ शकता.

महत्वाचे लेख