अ‍ॅपशहर

सातव्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे एक कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा लाभ मिळणार आहे. कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ होणार असली तरी, ती गेल्या ७० वर्षांतील सर्वात कमी आहे.

Maharashtra Times 29 Jun 2016, 5:09 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cabinet approved seventh pay commission
सातव्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी


केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना मंजुरी देण्यात आली आहे.

सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीकडे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले होते. अखेर बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सातव्या वेतन आयोगाने केलेल्या शिफारशींना मंजुरी देण्यात आली. यामुळे एक कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा लाभ मिळणार आहे. कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ होणार असली तरी, ती गेल्या ७० वर्षांतील सर्वात कमी आहे. प्रत्यक्ष वेतनवाढ १ जानेवारी, २०१६पासून लागू होणार आहे.

नोव्हेंबर २०१५ मध्ये वेतन आयोगाने वेतनवाढीसंदर्भातील शिफारशी केल्या होत्या. आयोगाने मूळ वेतनात १५ टक्के वाढ करण्याची शिफारस केली होती. आयोगाच्या शिफारशींत प्रस्तावित भत्त्यांचा समावेश केल्यास तब्बल २३.५५ टक्के वेतनवाढ होणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज