अ‍ॅपशहर

जुन्या नोटा बाळगल्यास पाच हजाराचा दंड

चलनातून बाद करण्यात आलेल्या पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा तुमच्याकडं असतील तर त्या तात्काळ जमा करा. कारण, ३१ मार्च २०१७ नंतर ठराविक रकमेपेक्षा जास्त जुन्या नोटा तुमच्याकडं आढळल्यास पाच हजार रुपयांचा दंड किंवा चार वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.

Maharashtra Times 28 Dec 2016, 2:09 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cabinet clears ordinance to impose penalty for holding old notes
जुन्या नोटा बाळगल्यास पाच हजाराचा दंड


चलनातून बाद करण्यात आलेल्या पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा तुमच्याकडं असतील तर त्या तात्काळ जमा करा. कारण, ३१ मार्च २०१७ नंतर ठराविक रकमेपेक्षा जास्त जुन्या नोटा तुमच्याकडं आढळल्यास पाच हजार रुपयांचा दंड किंवा चार वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा वटहुकूम जारी करण्यात आला. त्यानुसार, मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा बाळगणाऱ्यास दंड किंवा तुरुंगवास होणार आहे. त्याचवेळी, रिझर्व्ह बँकेच्या काही शाखांमध्ये ३१ मार्च २०१७ पर्यंत जुन्या नोटा जमा करण्याची सवलत देण्यात आली आहे. मात्र, या नोटा जमा करताना योग्य व समाधानकारक कारणं देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. काही वेळेला आरबीआयमध्ये पैसे जमा करताना पुरावेही सादर करावे लागणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

काळ्या पैशावाल्यांनी जुन्या नोटा दडवून ठेवल्याचा सरकारला संशय आहे. तो तिथल्या तिथंच नष्ट व्हावा. तसंच, जुन्या नोटांचा वापर करून सर्वसामान्यांची फसवणूक केली जाऊ नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येतं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज