अ‍ॅपशहर

१ जानेवारीपासून ATMमधून काढा ₹ ४,५००

नवीन वर्षाच्या तोंडावर रिझर्व्ह बँकेने आनंदाची बातमी दिली असून १ जानेवारीपासून एटीएममधून एका डेबिट कार्डने दिवसाला साडेचार हजार रुपये काढता येणार आहेत. चलनतुटवड्यामुळे रिझर्व्ह बँकेने एटीएममधून पैसे काढण्यावर मर्यादा घातल्यानंतर सध्या केवळ अडीच हजार रुपयेच दिवसाला काढता येत होते. ही मर्यादा आता २०१७च्या पहिल्या दिवसापासून वाढणार आहे.

Maharashtra Times 31 Dec 2016, 12:57 am
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cash withdrawal limit from atms increased to rs 4500 from rs 2500 its effective from january 1 rbi
१ जानेवारीपासून ATMमधून काढा ₹ ४,५००

नवीन वर्षाच्या तोंडावर रिझर्व्ह बँकेने आनंदाची बातमी दिली असून १ जानेवारीपासून एटीएममधून एका डेबिट कार्डने दिवसाला साडेचार हजार रुपये काढता येणार आहेत. चलनतुटवड्यामुळे रिझर्व्ह बँकेने एटीएममधून पैसे काढण्यावर मर्यादा घातल्यानंतर सध्या केवळ अडीच हजार रुपयेच दिवसाला काढता येत होते. ही मर्यादा आता २०१७च्या पहिल्या दिवसापासून वाढणार आहे.

नोटाबंदीला ५० दिवस पूर्ण झाल्यानंतर आता हळहळू पैशांची चणचण संपेल, असे संकेत आधीच सरकारी पातळीवरून मिळत होते. त्यात रिझर्व्ह बँकेने एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा थोडी सैल केल्याने लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी रात्री उशिरा एक निवेदन जारी केलं असून त्यानुसार १ जानेवारीपासून एका डेबिट कार्डवर दिवसाला साडेचार हजार रुपये काढता येणार आहेत. त्याचवेळी दर आठवड्याला धनादेशाद्वारे बँकेतून रक्कम काढण्याची मर्यादा मात्र २४ हजार रुपये इतकीच ठेवण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज