अ‍ॅपशहर

करदात्यांसाठी आनंदाची बातमी; केंद्र सरकारने दिली ही सवलत!

केंद्रीय प्रत्यक्ष बोर्डाने करदात्यांना दिलासा देत पुन्हा एकदा आयटी रिटर्न भरण्याची मुदत वाढवली आहे. करोना व्हायरस संकटाचा विचार करता सरकारने आयकर रिटर्न भरण्याची मुदत तिसऱ्यांदा वाढवली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Jul 2020, 12:37 pm
नवी दिल्ली: देशात करोना व्हायरसचे रुग्ण दिवसेदिवस वाढत आहेत. अशातच केंद्र सरकारने करदात्यांना एक मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष बोर्डाने (SBDT) आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी इनकम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतलाय.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम आयकर


वाचा- अंबानी ग्रुप कर्ज फेडण्यात ठरले अपयशी; बँकेचा मुख्यालयावर ताबा

इनकम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२० होती. जर या तारखेपर्यंत करदात्यांनी रिटर्न फाइल केले नाही तर त्याला पुन्हा संधी मिळणार नव्हती. आता ही मुदत ३१ जुलैवरून वाढवून ती ३० सप्टेंबर २०२० करण्यात आली आहे. सरकारने २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी रिटर्न दाखल करण्याची मुदत तिसऱ्यांदा वाढवली आहे.


या संदर्भातील माहिती केंद्रीय प्रत्यक्ष बोर्डाने आज (३० जुलै ) दिली. करोना व्हायरस संकटामुळे अनेक ठिकाणी लॉकडाउन आहे. यामुळे रिटर्न भरताना अनेक अडचणी येत आहेत. यामुळे मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

वाचा- सोन्याला नवी झळाळी; विक्रमी स्तरावर, जाणून घ्या आजचे दर

रिटर्न दाखल करण्याची मुदत ३१ मार्च होती. त्यानंतर ती वाढवून ३० जून करण्यात आली. पण करोनामुळे अनेकांना रिटर्न भरता आला नव्हता. म्हणून दुसऱ्यांदा त्याची मुदत ३१ जुलै करण्यात आली होती. आता ही मुदत ३० सप्टेंबर करण्यात आली आहे.

हे देखील वाचा-
अंबानींना मोठा झटका; २४ तासात संपत्ती २.३ अब्ज डॉलरने घसरली
जाणून घ्या; एक ऑगस्टपासून बदलणार आहेत हे १० नियम

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज